18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाची तारीख ठरली; लोकसभा अध्यक्ष कोण होणार?

0

राज्यसभेचे 264 वे अधिवेशन 27 जूनपासून

 

नवी दिल्ली(New Delhi) :- १२ जून 18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 24 जूनपासून सुरू होत असून ते 3 जुलैपर्यंत चालणार आहे, या संदर्भात केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी माहिती दिली आहे. या विशेष अधिवेशन काळात नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी, लोकसभा अध्यक्षांची निवड, राष्ट्रपतींचे अभिभाषण आदी कामकाज होणार आहे. याशिवाय राज्यसभेचे 264 वे अधिवेशनही 27 जूनपासून सुरू होऊन 3 जुलैला संपणार आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 27 जून रोजी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील आणि पुढील पाच वर्षांसाठी नवीन सरकारची वाटचाल कशी असेल याची रूपरेषा सांगतील.