चंद्ररथ थिएटर, नागपूर निर्मित द डार्क एज ने पटकाविला अद्वैत विदर्भ करंडक २०२४

0

यशवंत चोपडे सर्वोत्कृष्ट अभिनेता तर भावना चौधरी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पारंपारिक गोष्टींसोबत नवनवीन तंत्रांचा वापर रंगभूमी वर होणे गरजेचे ॲनिमेटर विजय राऊत

अद्वैत आयोजित अ‌द्वैत विदर्भ करंडक २०२४ विदर्भ स्तरीय मराठी खुली एकांकिका स्पर्धचा नुकताच बक्षिस वितरण सोहळा, सिपना इंजिनियरिंग कॉलेज, येथील अरविंद लिमये नाट्यगृहात पार पडला. अमरावतीचे सुपुत्र असलेले प्रसिद्ध ॲनिमेटर विजय राऊत, ज्येष्ठ कलावंत राजेश वानखडे, ॲड. मिलिंद जोशी, प्रा. डॉ. सावन देशमुख, डॉ. श्याम देशमुख, ॲड. चंद्रशेखर डोरले, प्रा. डॉ. भोजराज चौधरी तथा स्पर्धेला लाभलेले परीक्षक सौ. क्षिप्राताई डाखोडे – देशमुख, पुणे व रमेशजी थोरात, अकोला यांच्या हस्ते संपन्न झाला. दोन दिवस संपन्न झालेल्या या स्पर्धेत १३ नाट्यसंस्था सहभागी झाल्या होत्या त्यापैकी ८ एकांकिका सादर झाल्यात. ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट एकांकिका चा मान व अ‌द्वैत विदर्भ करंडक २०२४ चा मान पटकविला तो चंद्रथ थिएटर, नागपूर निर्मित द डार्क एज या एकांकिकेने या नाटकाचे निर्मिती प्रमुख आहेत देवयानी चोपडे आणि चंद्रकांत चौधरी, तसेच ‌द्वितीय अद्वैत विदर्भ करंडक हेमेंदू रंगभूमी, नागपूर वीर बाबुराव, तृतीय अद्वैत विदर्भ करंडक, तन्मयी बहुउ‌द्देशीय संस्था, नागपूर धडीचा, तर लक्षवेधी एकांकिका चा अ‌द्वैत विदर्भ करंडक सहयोगी कलावंत सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक संस्था, वर्धा जनता गॅरेज यांनी पटकविला. वैयक्तिक पुरस्कार प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार एकूण ८ विभाग करून देण्यात आलेले होते.

पार्श्वसंगीत प्रथम ट्विंकल चोपडे, द्वितीय सुरज वैद्य, तृतीय प्रणव कोरे, नेपथ्य प्रथम प्रशांत खडसे, धर्मेंद्र चोपडे, द्वितीय निखील सखे, हिमांशू बानोले, तृतीय पुष्पा चौधरी, प्रकाशयोजना प्रथम ऋषभ धापोडकर, द्वितीय अमित शेंडे, तृतीय अपूर्वा खनगन, हर्ष नागभिडे, रंगभूषा प्रथम पुष्पा चौधरी, द्वितीय प्रा. शुभम ठाकरे, तृतीय नलिनी बनसोड, अभिनेत्री भावना चौधरी, द्वितीय आकांशा भाके, तृतीय आरती मलांडे, अभिनेता प्रथम यशवंत चोपडे, द्वितीय गौरव भोयर, तृतीय वरुणराज नागुलवार, दिग्दर्शक प्रथम यशवंत चोपडे, द्वितीय सलीम शेख, तृतीय चैतन्य दुबे, लेखक प्रथम चंद्रकांत चौधरी, द्वितीय गौरव भोयर, तृतीय चैतन्य दुबे यांनी पारितोषिक पटकाविले. परीक्षक रमेश थोरात व परीक्षक क्षिप्रा देशमुख व आयोजन सहकार्य दिल्याबद्दल वल्ल्हरी देशमुख यांचा सत्कार विजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. दीपप्रज्वलन, मान्यवरांचे स्वागत, मनोगत झाल्यावर बक्षिस वितरण सोहळ्याला सुरवात झाली. बक्षिस वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन विशाल रमेश तराळ, तर आभारप्रदर्शन डॉ. प्रा. मनोज उजेन्कर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉ. श्याम देशमुख, सौ. तृप्ती मेश्राम, सौ. स्वाती तराळ, अनुराग वानखडे, अजय इंगळे, मनिष प्रजापती, स्वेहा तराळ, अद्वैत तराळ, समाधान तांबे यांनी परिश्रम घेतले.