

चंद्रपूर (Chandrapur) :- डेव्हलपमेंट अँड रिसर्च एज्युकेशन मल्टिपर्पज सोसायटी (ड्रीम) चंद्रपूर च्या वतीने श्रमिक पत्रकार भवन चंद्रपूर येथे आयोजित हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त “क्रीडा पर्व-२०२५” अंतर्गत समापन समारोह व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरचे सत्काराचा कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार सुधाकर अडबाले उपस्थित होते.
यावेळी चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोक जीवतोडे, निलेश ठाकरे, इंजि. गौतम नागदेवते, रामनगर पोलीस स्टेशनचे सचिन राखुंडे, इंजि. प्रदीप अडकीने, ड्रीमचे अध्यक्ष प्रेम गावंडे, उपाध्यक्ष अभिजीत दुर्गे, सचिव अनिल ठाकरे, कोषध्यक्ष निलेश शेंडे आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्ह्यातील ज्येष्ठ खेळाडू तसेच आठवडाभर चाललेल्या विविध स्पर्धातील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
मेजर ध्यानचंद यांनी हॉकीच्या माध्यमातून देशाचे नाव जगभर उज्ज्वल केले. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून आपले व देशाचे नाव उज्वल करावे, असे आवाहन आमदार सुधाकर अडबाले यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिनेश सावसाकडे, महावीर यादव, लोकेश मोहुर्ले, शुभम साखरे, शुभम पुणेकर, आकाश इंगळे, मनीष जैसल, सिद्धार्थ सूर्यवंशी, भारत विरुडकर, सोनाली गावंडे, आयेशा शेख, श्रुती भारती, शर्वरी लमाने, करिष्मा राजपूत, निधी झाडे आदीने परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय तावडे तसेच आभार प्रदर्शन ड्रीम चंद्रपूरचे सचिव अनिल ठाकरे यांनी केले.