आव्हान मुस्लिमांच्या व्होट जिहादचे

0

आव्हान मुस्लिमांच्या व्होट जिहादचे

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणूक प्रचारात उत्तरप्रदेशातील फर्रुखाबाद मतदारसंघात सलमान खुर्शिद यांची भाची आणि समाजवादी पक्षाच्या नेत्या मारिया आलम यांनी पक्षाच्या एका प्रचार सभेत ‘वोटों का जिहाद करो, क्योंकि हम वोट जिहाद ही कर सकते हैं’ असे वक्तव्य करून वातावरण तापवून दिले होते. या वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांच्याविरुद्ध निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल गुन्हाही दाखल झाला होता. त्यावेळी त्यांच्या भाषणाचा प्रभाव केवळ त्या मतदारसंघापुरता मर्यादित नाही, याचा साधा वासही कुणाला आला नाही. मतमोजणीनंतर देशभरात मुस्लिमांच्या मतदानाचा जो ट्रेंड दिसून आला, त्यातून या घातक, देशविरोधी, घटनाबाह्य कटकारस्थानाचा उलगडा झाला. माझी बहीण प्रियंका वढेरा वाराणशीत काँग्रेसकडून उभी राहिली असती तर नरेंद्र मोदींचा हमखास पराभव झाला असता, या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विधानामागची समीकरणेही हळूहळू उलगडली. देशभरातील मुसलमानांनी विभिन्न राज्यांमध्ये इंडी आघाडीच्या उमेदवारांना एकगठ्ठा मतदान केले नसते तर आज नाक वर करून बोलणाऱ्या उबाठापासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणि काँग्रेसपासून डाव्या पक्षांच्या नेत्यांना बोलायला जागाच उरली नसती. देशात ‘संविधान बचाओ’चा नारा, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या, ओबीसींची जनगणना, मराठा-राजपूतांचे प्रश्न, अग्निवीर योजनेची अंमलबजावणी, सत्ताधारी पक्षाविरुद्धची हवा, मोदींची कार्यपद्धती यावरून नाराजी जाणवत होती. मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडीला या नाराजीतून 30 जागी विजय मिळेल आणि इंडी आघाडी उत्तर प्रदेश, राजस्थानादी प्रांतात वरचढ ठरेल, असे कुणालाच वाटले नाही. ममतांची घोडदौडही पश्चिम बंगालमध्ये कुणी अपेक्षित केली नव्हती. अनेकांनी म्हणजेच भाजपच्या काही आणि काँग्रेसच्या साऱ्याच समर्थकांनी 400 पारचे लक्ष्य गाठणे अशक्य असल्याची मते मात्र मांडली होती. याउपरही काँग्रेस आणि इंडी आघाडीतील घटक पक्षांना मिळालेले यश हे केवळ मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतदानाने अर्थात व्होट जिहादने शक्य झाले, हा निष्कर्ष काढण्यासाठी कोणा ज्योतिष्याची गरज भासायला नको.

 

*मतदारांमध्ये भरविली धास्ती*

 

देशभरात मुस्लिम मतदारांचे ध्रूवीकरणे केले गेले. मुस्लिमांच्या मनात भाजपा 400 पार झाला तर संविधान बदलले जाईल, मशिदी तोडल्या जातील, मजारी उद्वस्त केल्या जातील, नमाज पढण्यावर बंधने येतील, मुस्लिमांना पाकिस्तानात हाकलले जाईल, अशी भीती भरवण्यात आली. काही ठिकाणी तर मुल्ला, मौलवींनी थेट मंचावरून भाजपच्या विरोधात जिंकू शकणारा उमेदवार कोण, त्याचे काम काय, तो कोणत्या पक्षाचा आहे, हे न बघता केवळ मोदींचा पराभव करण्यासाठी मतदान करण्याचे फतवे काढले. संविधानातील तरतुदी दुर्लक्षूनही देशातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता इंडी आघाडीला उलथवून टाकता आली नाही, याबद्दल भारतीय मतदारांनी दाखविलेल्या प्रगल्भतेचे स्वागतच करायला हवे. हिंदूंमधील ओबीसी, दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, उच्चवर्णीय आणि सोबतीला इतर छोट्या-मोठ्या जातींचे मतदार खंबीरपणे भाजपच्या पाठीशी उभे राहिल्याने त्याला 240 आणि रालोआला 292 जागांपर्यंत मजल मारता आली.

लाभ एकाकडून मते दुसऱ्याला

देशभरात भाजपला मिळालेल्या कमी जागांसाठी अतिआत्मविश्वास नडला असा निष्कर्ष काढायला विश्लेषक मोकळे आहेत. पण यंदाच्या निवडणुकीतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अँटी इन्कम्बन्सी जी कोणत्याही सरकारसोबत सावलीसारखी येते, ती अपवाद वगळता फारशी दिसली नाही. देशातील मतदारही मोदी सरकार पुन्हा येणार याबाबत आश्वस्त होते. पण मुस्लिम मतांचे छुप्या पद्धतीने धोरणात्मकदृष्ट्या करण्यात आलेले ध्रूवीकरण हेच इंडी गठबंधनाच्या विजयाचे राज आहे, याबाबत कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. मतांचा हाच पॅटर्न येत्या काळात देशासाठी घातक आणि डोकेदुखीही ठरणार आहे. भाजपश्रेष्ठींना यावर तोडगा काढावा लागणार आहे. पण केंद्रीय योजनांचे विशेषतः आयुष्यमान भारत, हर घर नल, उज्ज्वला योजना, शौचालय उभारणी, प्रधानमंत्री आवास योजना आदींचे 40 टक्के लाभार्थी मुस्लिम असताना, त्यांनी मतादनाच्या वेळी भाजप आणि रालोआच्या पाठीत खुपसलेला खंजीर महाराष्ट्रातील एका पुढाऱ्याच्या राजकारणाची आठवण करून गेला.

4 जूनच्या निकालाने हे दाखवून दिले आहे की, या समुदायाने धोरणात्मकरित्या इंडी आघाडीला मजबूत करण्याचे काम तर केलेच, शिवाय आपली मते कुणी खाणार नाही, याची काळजीही घेतली. इंडिया टूडे एक्सिसने काढलेल्या निष्कर्षानुसार या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मतदान करणाऱ्या मुस्लिम मतदारांची टक्केवारी 33 हून 38 वर गेली. म्हणजे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या पक्षाला 5 टक्के जादा मुस्लिम मते मिळाली. काँग्रेससोबत हातमिळवणी करणाऱ्या इंडी आघाडीतील इतर पक्षांची मुस्लिम मते 23 टक्क्यांनी वाढली. अर्थात त्यांना मिळालेल्या मतांमध्ये गेल्या निवडणणुकीच्या 19 टक्क्यांच्या तुलनेत 42 टक्के वाढ झाली. इंडी आघाडीतील सर्व पक्षांना मिळालेल्या एकूण मुस्लिम मतांमध्ये 28 टक्क्यांनी वाढ झालेली दिसून आली. या तुलनेत भाजप आणि त्यांच्या घटक पक्षांना मिळालेल्या मुस्लिम मतांमध्ये घट झाली. भाजपला गेल्या निवडणुकीत मिळालेल्या मुस्लिम मतांमध्ये 3 टक्क्यांची तर त्याच्या घटक पक्षांना मिळालेल्या मुस्लिम मतांमध्ये 5 टक्क्यांची घट झाली. भाजपाला केवळ 1 टक्का आणि घटक पक्षांना केवळ 2 टक्के मते देऊन मुस्लिमांनी आपण किती कृतघ्न आहोत हेच दाखवून दिले. अपक्ष आणि बहुजन समाज पार्टीसारखे पक्ष, जे कोणत्याच आघाडीत सहभागी नव्हते, त्यांच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांमध्ये गत निवडणुकीच्या तुलनेत 22 टक्क्यांची घट बघायला मिळाली. त्यांना यावेळी केवळ 17 टक्के मुस्लिम मतांवर समाधान मानावे लागले. उत्तर प्रदेशात इंडी आघाडीच्या मुस्लिम उमेदवारांना मिळालेल्या विजयाची टक्केवारी 83 टक्के आहे. समाजवादी पक्षाने उभे केलेले चारही उमेदवार विजयी झाले असून, काँग्रेसने उभ्या केलेल्या दोघांपैकी एका मुस्लिम उमेदवाराने लोकसभेत प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांच्या मताधिक्यात झालेली घट मोठ्या ष़डयंत्राकडे अंगुलीनिर्देश करते.

*महाराष्ट्रात फटका*

महाराष्ट्रात भाजपा आणि मित्र पक्षांना मुस्लिम मतांच्या ध्रूवीकरणाचा मोठा फटका बसला. निवडणुकांचे ट्रेंड हाती येताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी महाराष्ट्रात मोठे कट-कारस्थान रचले गेल्याची प्रतिक्रिया दिली. शिंदे शिवसेनेचे नेते दीपक केसरकर म्हणतात, भाजपा, शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध मुस्लिम धर्मगुरूंनी फतवे जारी केल्याने काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांना मुंबईसह सांगली, बारामती, शिरूर आणि दिंडोरीची जागा जिंकता आली. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला तिलांजली दिली, याची मुस्लिमांना खात्री पटल्याने त्यांनी एकमुस्त मतदान करून मुंबईत उद्धव सेनेला विजयी बनविले. मुस्लिमांची मते मिळाली नसती तर त्यांच्या उमेदवारांचा एक ते दीड लाखांनी पराभव अटळ होता.’’ पुण्याच्या कोंढवा येथे आयोजित तंझीममध्ये हजरत मौलाना सज्जाद नोमानी यांनी काँग्रेस, उद्धव सेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांनाच मते देण्याचा फतवा काढला होता, ही बाब नंतर उघड झाली. त्या तंझीमधील वक्त्यांची भाषणेही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.

काँग्रेस, शरद पवार, उद्धव यांचे यश

या निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण करायचे झाल्यास, काँग्रेसने सरळ सरळ हिंदू मुस्लिम असे भारतीय जनमानस विभाजित करून निवडणूक लढल्याचे स्पष्ट होते. अनेक ठिकाणी काँग्रेस उमेदवार जिंकून यावा यासाठी बहुतांश मुस्लिमांनी मतदान केले. मुस्लिम समाजाची मते काँग्रेससाठी एकत्रित कर झालीच शिवाय त्यांचे अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी सुद्धा प्रयत्न केले गेले. त्यामुळे अनेक मतदारसंघांत मुस्लिम समाजाचे 90 टक्क्यांपेक्षाही जास्त मतदान झाले. उत्तरप्रदेशात ज्याप्रमाणे यादव आणि मुस्लिम मतांचे एकत्रीकरण होवून त्यांच्या मतांच्या बेरजेने समाजवादी पक्षांचे उमेदवार बहुसंख्येने निवडून आले, तोच फॉर्मुला महाराष्ट्रात वापरून मराठा, दलित आणि मुस्लिम समाजाची मते महाविकास आघाडीकडे वळवण्यात काँग्रेस, शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांना यश आल्याचे दिसते आहे.

वोटिंग पॅटर्न

मुस्लिमांच्या वोटिंग पॅटर्न जाणून घ्यायचा झाल्यास लोकसभेच्या सोलापूर मतदारसंघावर कटाक्ष टाकायला हवा. सोलापूर शहर (249) येथील मध्य विधानसभा मतदारसंघाच्या प्रभाग क्र. 8 मध्ये झालेल्या मतदानापैकी 2688 मते काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना तर त्यांचे प्रतिस्पर्धी राम सातपुते यांना फक्त 320 मते मिळाली. येथील पाचही मतदान केंद्रे मुस्लिम बहुल वस्तीतील आहेत. असाच काहीसा पॅटर्न आपल्याला प्रभाग क्र. 14 मध्ये सुद्धा पाहायला मिळाला. या प्रभागामध्ये सुद्धा उर्दू शाळा किंवा मुस्लिम मोहल्ल्यांमधून सर्वाधिक मते प्रणिती शिंदे यांनाच मिळाली. बूथ 16 चा अभ्यास केला, तर आपल्यासमोर चित्र स्पष्ट होईल की, या बूथवर झालेल्या 847 जणांच्या मतदानापैकी एकूण 826 मते प्रणिती शिंदे यांना मिळाली आहेत. विजापूर वेरा, कुरेशी गल्ली, फेमस हॉटेल यासारख्या मुस्लिम बहुल परिसरांमधून सुद्धा सर्वाधिक मते त्यांनाच पडली. या परिसरातील एका बूथवर 567 जणांचे मतदान झाले, त्यापैकी फक्त 25 मते प्रतिस्पर्धी राम सातपुते यांना मिळाली.

धुळ्यात चक्क हिंदू-मुस्लिम विभाजन

सोलापूर व्यतिरिक्त आपल्याला हा मुस्लिम मतदानाचा पॅटर्न धुळ्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतो. धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचा 3831 मतांनी पराभव झाला. या मतदारसंघातील धुळे ग्रामीण, सिनखेडा, बाह्य मालेगाव, बागलन आणि धुळे शहर या 5 विधानसभा क्षेत्रातून भाजपला 1,90,496 मतांची आघाडी मिळाली, परंतु सहाव्या मालेगाव विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसला तब्बल 1,98,869 मते तर भाजपला केवळ 4,542 मते मिळाली. मालेगाव सेंट्रलची लोकसंख्या 76 टक्क्यांहुन अधिक मुस्लिम असल्याने सांदिपन भामरे यांचा अत्यल्प म्हणजे केवळ 3831 मतांनी पराभव करण्यात या भागातील लोकसंख्येची भूमिका महत्त्वाची राहिली.

मुस्लिमांचे धोरणात्मक मतदान

मुस्लिमांच्या धोरणात्मक मतदानाचा प्रकार मुंबई, भिवंडी येथेही बघायला मिळाला. मुंबईतील भेंडी बाजार, मोहम्मद अली रोड, चोर बाजार येथील 12 बूथमधून शिंदे सेनेच्या यामिनी जाधव यांना फक्त 1 आकडी (सिंगल डिजिट) मते मिळाली. बूथ क्रमांक 191 मध्ये तर त्यांना केवळ 1 मत तर ऊबाठा सेनेच्या अरविंद सावंतांना 311 मते मिळाली. भांडुपमध्ये सुद्धा असाच काहीसा पॅटर्न पाहायला मिळाला. जिथे आमदार आणि नगरसेवक ऊबाठाचा असून सुद्धा भाजपच्या मिहीर कोटेचा यांना 100 मतांची आघाडी मिळाली, परंतु पठाण कॉलनी, दर्गा रोड, रहिम नगर, सोनापूर या 13 बूथमधून उद्धव सेनेच्या संजय पाटील यांना 3500 मतांचे मताधिक्य मिळाले. भिवंडी मतदारसंघात आजमीनगर, वाजा मोहल्ला या भिवंडी पश्चिमच्या 83 बूथ परिसरात भाजपाचे कपील पाटील यांना 441 मते, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश म्हात्रे यांना 52,773 मते मिळाली. भिवंडी पूर्वमधील आसबीबी नगर, मिल्लत नगर येथील 76 बूथमध्ये भाजपाला 325 मते तर शरद पवारांच्या उमेदवाराला 37,299 मते मिळाली. वोट जिहादचा हा प्रकार धिक्कारार्हच म्हणावा लागेल. म्हणूनच शिंदे सेनेने उद्धव सेनेला मिळाल्याला यशाचा रंग कोणता आहे, हा प्रश्न उपस्थित करून, त्यांनी हिंदुत्वाला दिलेली बगल, ही या विजयामागची खरी गोम असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

अमरावतीतही वोट जिहाद

विदर्भातील अमरावती मतदारसंघात भाजपाने नवनीत राणा या लोकसभेतील कार्यकुशल महिलेला तिकीट दिले होते. पण वोट जिहादमध्ये त्यांची धुळधाण उडाली. ज्येष्ठ भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करून त्यांच्या पराभवाच्या कारणांबद्दल दिलेली माहिती सामान्य मतदारांचे डोळे विस्फारून टाकणारी आहे. जमील स्कूल बूथमधील ३ क्रमांकाच्या खोलीत नवनीत राणा यांना शून्य मत मिळाले तर काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांना 871 मते मिळाली. याच बूथवरील खोली क्रमांक 1 मध्ये भाजपाला 1 तर काँग्रेसला 783 मते मिळाली. परिसरातील 36 मतदान केंद्रांवर भाजपला 126 तर काँग्रेसला 25748 मते मिळाली आहेत.

वोट जिहादला उत्तर काय?

याच वोट जिहादमुळे हिंदू जनमत संतप्त झाले आहे. देशात सर्वत्र हा पॅटर्न अवलंबला गेला. मात्र ठिकठिकाणच्या हिंदू मतदारांनी आपली जात-पात विसरून राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांमागे आपली मतशक्ती भरभक्कमपणे उभी केल्याने इंडी आघाडीच्या कट कारस्थानाला सुरूंग लागला. भारतीय लोकशाही प्रगल्भ झाली आहे, हे आपण वारंवार सिद्ध केलेलेच आहे. वेळोवेळी मतदारांनी आपला कल दाखवून सत्तांतरे घडवून आणली आहेत. यावेळीही मतदारांनी इंडी आघाडीला बहुमतापासून दूर ठेवून ‘सत्ता का रास्ता और दूर है’, हा संदेश दिला आहे. मुस्लिमांच्या झालेल्या धोरणात्मक मतदानाला पुढच्या निवडणुकांमध्ये कसा छेद द्यायचा, याचे उत्तर वेळेत शोधले नाही तर त्याविरुद्धजी नाराजी रस्त्यावर आल्यासिवाय रहायची नाही. मुस्लिमांनी या निवडणुकीत भाजप किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला नव्हे तर राष्ट्रवादी हिंदूंना डिवचले आहे.

चारुदत्त कहू | 9922946774