

नाट्यरंग-नमन नटवरा’ला नाट्य रासिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; स्व. मोरेश्वर देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विशेष आयोजन
नागपूर (Nagpur), 05 एप्रिल 2025: संगीत नाटकाची सुरवात नांदी ने होते, त्याच धर्तीवर ‘नमन नटवरा विस्मयकारा’ या सांघिक सादरीकरनाणे सुरवतीलचा उपस्थितांची मने जिंकली. अंतर्नाद निर्मित व सप्तक आयोजित मोरेश्वर माधव देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘नाट्यरंग-नमन नटवरा’ हा साभिनय नाट्यगीतांचा कार्यक्रम आज गायत्रीनगर येथील पर्सिस्टंट सिस्टिम्स, कवी कुलगुरू ऑडिटोरियम येथे आयोजित करण्यात आला. यावेळी एका पेक्षा एक निवडक आणि दर्जेदार नाट्यगीतांचा नजराणा गायक कलाकारांनी प्रस्तुत केला.
कार्यक्रमाची संकल्पना गायत्री हरीश मोडक यांची होती आणि त्यांनीच कार्यक्रमाचे उत्कृष्ट आणि अभ्यासपूर्ण निवेदन देखील केले. कार्यक्रमाचे संयोजक गजानन रानडे होते. संगीतनाटकतील प्रसंग-वर्णन आणि त्याला जोडून येणारी नाट्यगीते असा कर्णमधुर प्रवास करताना सर्वप्रथम संगीत मनापामान मधील पद ‘खरा तो प्रेम न धरी लोभ मनी’ हे नाट्य पद मंजिरी अय्यर यांनी सादर केले. त्यांनंतर त्याच नाटकातील ‘नाही मी बोलत नाथा’ हे पद निधी रनाडे यांनी सादर केले. पुढे संगीत सौभद्र या अजरामर संगीत नाटकातील सुभद्रा यांच्या तोंडी असलेले पद ‘वद जाऊ कुणाला शरण गं’ हे सीमा दामले यांनी गायले आणि श्रोत्यांनी सभागार टाळ्यांनी कडाडून टाकले. त्यानानंतर संगीत सौभद्र मधील ‘नच सुंदरी धरू कोपा’ हे पद यश खेर यांनी, सन्यस्त खङग मधील पद ‘मर्म बंधातली ठेव हि’ ह्रिषीकेश करमरकर यांनी सादर केले.
याशिवाय अण्णासाहेब किर्लोस्कर, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, बाल गंधर्व, मास्टर दीनानाथ मंगेशकर, भास्करबुवा बखले, पुरुषोत्तम दारव्हेकर, छोटा गंधर्व, पं. जितेंद अभिषेकी, जयमाला शिलेदार, कीर्ती शिलेदार अशा अनेक दिग्गज नाटककार लेखक संगीतकार, गायक कलाकारांची गाजलेले पदं जसे युवती मना, विकलं मन आज, गर्द सभोवारी, नाथ हा माझा, लागी कालेजवा कटार, सुरत पिया कि, अशी विविध नाट्य पदं सादर करण्यात आली. कट्यार काळजात घुसली मधील राग माला आणि अवघा रंग ने कार्यक्रमाचा समारोप झाला.
तत्पूर्वी गायक कलावंत डॉ. मंजिरी अय्यर, सीमा दामले, हृषीकेश करमरकर, यश खेर, निधी रानडे या आणि वादक कलावंत संवादिनी वादक श्रीकांत पिसे आणि तबला वादक वेद ढोक यांचा स्वागत सत्कार स्पेसवूडचे विवेक देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदय गुप्ते यांनी केले तर सप्तकतर्फे उदय पाटणकर, श्रीकांत देशपांडे, अरविंद चोपडे, प्रदीप मुंशी, विकास लिमये, राजाभाऊ हिवरकर, विलास मानेकर यांची विशेष उपस्थिती होती.