


नागपूर (Nagpur)- यावर्षी शेतकऱ्याचा हरभरा पेरणीकडे मोठ्या प्रमाणावर कल होता. त्यामुळे गव्हाची पेरणी कमी झाली. एप्रिल महिना सुरू असल्याने त नागरिक वर्षभरासाठी धान्य साठवून ठेवतात त्यामुळे गव्हाची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असते. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी गहू विक्री केली आहे आणि ज्या व्यापाऱ्यांनी गहू खरेदी केली आहे त्या व्यापाऱ्यांकडून नागरिक वर्षभराच्या साठवणीसाठी गहू खरेदी करताना दिसत आहे.
गेल्या वर्षापेक्षा यावर्षी गव्हाची आवक कमी आहे. त्याचप्रमाणे गेल्या महिन्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने गव्हाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यावर्षी गव्हाच्या उत्पादनात घट झाली असून किमतीमध्ये देखील वाढ झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये मध्यप्रदेशमधून गव्हाची आवक वाढण्याची शक्यता आहे. मात्र आवक जरी वाढली तरी गव्हाच्या किमतीत वाढ होईल असा अंदाज व्यापाऱ्यांकडून वर्तवला जात आहे.