दत्‍तक पालक मेळावा

0

स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा येथील कै.सुंदराबाई साने सभागृहात रविवारी ‘वसा शिक्षणाचा, प्रगतीच्या पाऊलखुणांचा’ हा दत्तक पालक मेळावा संपन्न झाला.

स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाने “वसा लेकीच्या शिक्षणाचा” हा उपक्रमांतर्गत ग्रामीण व आदिवासी भागातील मुलींचा सर्वांगीण विकास व्हावा, यादृष्टीने त्‍यांना उत्तम शिक्षण देण्‍यात येते. या मुलींच्या शिक्षणाचा मार्ग सुकर करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या आश्रयदात्‍यांचे हे स्नेहमीलन होते.

या कार्यक्रमाला सनदी लेखापाल माधव विचोरे, ऑल इंडिया रिपोर्टरचे संचालक सुमंता चितळे, स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविंद्र फडणवीस, उपाध्यक्ष प्रशांत पाध्ये व विजय घाटे, सचिव मीरा चाफेकर, दिलीप खोडे तसेच इतर पदाधिका-यांसह आश्रयदाते मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

यावेळी उपक्रमात शाळेशी जोडले जाऊन विद्यार्थिनींच्या शिक्षणाचा मार्ग सोपा करावा, असे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले. त्‍याकरीता श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा महाल, नागपूर येथे आपण संपर्क साधू शकता. शाळेच्या मुख्याध्यापिका माया बमनोटे यांनी प्रस्ताविक केले तर उर्वशी डावरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सचिन बक्षी यांनी आभार प्रदर्शन केले.