या अभिनेत्रीने दिला गोंडस मुलीला जन्म

0
या अभिनेत्रीने दिला गोंडस मुलीला जन्म
The actress gave birth to a cute baby girl

मुंबई:-बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण गेल्या काही दिवसांपासून गरोदर असल्यामुळे विशेष चर्चेत होती. आता अभिनेत्रीने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला आहे. रणवीर व दीपिका आई-बाबा झाले आहेत. दीपिकाने चिमुकलीला जन्म दिला आहे. रणवीर व दीपिका यांना मुलगी झाली आहे. दोघांनीही लेक झाली असल्याची गुडन्यूज चाहत्यांसह शेअर केली आहे. दीपिका व रणवीर यांच्या बाळाच्या येण्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. गणेश चतुर्थीच्या खास मुहूर्तावर आता अभिनेत्री दीपिका पती रणवीर सिंगने गुडन्यूज दिली आहे. (Deepika Padukone Baby Girl)

दीपिकाचा हॉस्पिटलमधील व्हिडीओ व्हायरल होताच तिचे चाहते आनंदाची बातमी ऐकण्याची वाट पाहत होते. अखेर आता अभिनेत्रीने चाहत्यांच्या आनंदाची बातमी देत धक्का दिला आहे. अभिनेत्रीची डिलिव्हरीची तारीख या महिन्यात असल्याचे सांगण्यात आलं होतं. दीपिका व रणवीर यांनी आता त्यांच्या पहिल्या लेकीचे स्वागत केले आहे. दीपिका पदुकोण व रणवीर सिंग त्यांच्या कुटुंबासह मुंबईतील एच.एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आहेत. बाळाच्या येण्याच्या बातमी ऐकून सारेच खूप खुश झाले आहेत.