चला बाॅटनिकल गार्डन बघूया | Shankhnaad News #shankhnaadnews #live

0

Botanical Garden Chandrapur 

नैसर्गिक वनसंपदेने समृद्ध असलेला चंद्रपूर जिल्हा. घनदाट हिरव्यागार वनराईने नटलेल्या या भागात पुरातन वास्तु आणि काेळसा खाणींची माेठी साधनसंपत्ती लाभली आहे. आता जागतिक दर्जाच्या बाॅटनिकल गार्डनमुळे नवी ओळख निर्माण झाली आहे. चंद्रपूर शहरापासून अवघ्या १५ किमी अंतरावरील विसापूर गावानजीक 108 हेक्टर क्षेत्रात जागतिक दर्जाचे बॉटनिकल गार्डन उभारण्यात आल. श्रद्धेय श्री. अटलबिहारी वाजपेयी वनस्पती उद्यान अर्थात बॉटनिकल गार्डनच्या समोरील प्रवेश दरवाजा आणि भिंतही पर्यटकांसाठी लक्षवेधी ठरणारी आहे.

 

जुन्या परंपरेतील संस्कृतीचा वारसा टिकून राहावा याच पद्धतीचे दर्शन या भिंतीवर होते. राजेशाही राजवाड्याप्रमाणे या भिंती तयार करण्यात आलेल्या आहेत. निसर्ग शिक्षण, मनोरंजन आणि निसर्ग पर्यटन यात वाढ करणे. स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. वातावरण बदल व ग्लोबल वॉर्मिंग याबाबत जनजागृती घडून ग्रीन एनर्जीचा वापर करण्याकरिता प्रोत्साहन देणे. आदी या मागील ऊद्देश आहे. 

 

या बॉटनिकल गार्डनमध्ये अत्याधुनिक मत्स्यालय, सायन्स सेंटर, फुलपाखरू उद्यान, अॅक्वास्केपचा समावेश आहे. या गार्डनमध्ये अत्याधुनिक सुविधांच्या इमारती तयार करण्यात आल्या आहेत. ताडोबाच्या जंगलाची सफारी करणाऱ्या तमाम पर्यटकांसाठी ही बॉटनिकल गार्डन मोठी पर्वणी ठरणार आहे. अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेले हे देशातील पहिलेच बॉटनिकल गार्डन ठरत आहे. बाॅटनिकल गार्डन पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि चाहत्यांसाठी खास बग्गीची व्यवस्था करण्यात आली आहे.बॅटरीवरच्या या इलेक्ट्राॅनिक बग्गीतूनच पर्यटकांना या परिसरात प्रवास करता येणार आहे.

Botanical garden chandrapur timings

Botanical garden chandrapur ticket price
botanical garden chandrapur recruitment
botanical garden ballarpur
butterfly garden chandrapur
botanical garden visapur entry fee
botanical garden ballarpur information
garden in chandrapur

 

 आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा… 👉🏻 Website – https://www.shankhnaad.live/ 👉🏻    / @shankhnaadnews1   👉🏻 Facebook – https://www.facebook.com/profile.php?… 👉🏻 Instagram –   / shankhnaadnews   👉🏻 Twitter –   / liveshankhnaad   📱 Android App – https://play.google.com/store/apps/de… 🪀 Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029Va5Y…