Textiles Committee Mumbai Bharti : ‘या’ रिक्त पदांसाठी भरती सुरू… अर्ज करण्यासाठी उरलेत काही दिवस….

0

Textiles Committee Mumbai Bharti 2024: वस्त्रोद्योग समिती, वस्त्र मंत्रालय, मुंबई (Mumbai) येथे भरती सुरू आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. चार रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरायचा आहे. तसेच पात्र पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. भरती प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज लवकरात लवकर पाठवायचे आहेत. भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे आणि पदसंख्या, अर्ज कसा करायचा, मुलखातीचे स्थळ याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

पदे व पदसंख्या –

सल्लागार (Consultant) – १ जागा.

तांत्रिक अधिकारी (Technical Officer) – ३ जागा.

शैक्षणिक पात्रता –

सल्लागार पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला बी.ई. / बी.टेक. टेक्स्टाईल किंवा बी. / B.F. टेक. N.I.F.T कडून + वस्त्रोद्योगातील ५ वर्षांचा अनुभव असावा.

तांत्रिक अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला बी.ई. / बी.टेक. टेक्स्टाईल किंवा बी. / B.F. टेक. N.I.F.T कडून + 2 वर्षांचा वस्त्रोद्योग आणि अध्यापनाचा अनुभव असावा.

हेही वाचा.. NFDC Mumbai Recruitment 2024 : फिल्म बाझार २०२४ साठी विविध पदांवर होणार भरती! ७० हजारपर्यंत मिळू शकतो पगार .https://www.shankhnaad.live/nfdc-mumbai-recruitment-2024-recruitment-for-various-posts-for-film-bazaar-2024-salary-can-be-up-to-70-thousand/

 

सल्लागार पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास ६५ हजार रुपये पगार दिला जाईल.

तांत्रिक अधिकारी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास ४५ हजार रुपये पगार देण्यात येईल.

मुलाखतीचे स्थळ –

वस्त्रोद्योग समिती, दुसरा मजला, पी. बाळू रोड, प्रभादेवी चौक, प्रभादेवी, ४०००२५.

मुलाखतीची तारीख आणि वेळ –

भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना ७ जून २०२४, सकाळी ११ ते दुपारी १:३० पर्यंत बोलावण्यात येईल. उमेदवाराने मुलाखतीच्या दिवशी सकाळी १०:१५ मिनिटांपर्यंत किंवा त्या आधी उपस्थित राहावे.

कोणती कागदपत्रे बरोबर ठेवावी?

वॉक-इन मुलाखतीच्या वेळी उमेदवाराने अर्जाचा नमुना, प्रमाणपत्रे आणि प्रशस्तिपत्रांची स्वयं-साक्षांकित प्रत आणि अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो बरोबर आणावा. तसेच वॉक-इन मुलाखतीच्या वेळी उमेदवाराने त्यांची मूळ सहाय्यक कागदपत्रे (D.O.B., शिक्षण, अनुभव, वैध सरकारी ओळखपत्र इ.) आणावीत.

अधिक माहितीसाठी अधिसूचना तपासून घ्यावी –

लिंक – https://drive.google.com/file/d/1kWhaYQ0Sg2mLoOZtc-HgVUFXLeI6f7GO/view

उमेदवार या लिंकवरून थेट अर्ज करू शकतात.

लिंक – https://drive.google.com/file/d/1PaoIyQ-yDiZduYKGHnSkZE4dHWFSfHC_/view

टीप : सर्व पदे कराराच्या आधारावर आहेत, म्हणजेच ३१/०३/२०२५ पर्यंत असणार आहेत.