विविध राज्यांतील खेळाडूंचे नैपुण्य पणाला

0

सुधीर मुनगंटीवार यांच्या आयोजनाची खेळाडूंना भूरळ

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालूका क्रीडा संकुलात होणाऱ्या 67 व्या राष्ट्रीय शालेय क्रिडा स्पर्धांमधे 34 राज्यांतून खेळाडू विजेतेपदासाठी झुंजत आहेत. या सर्व खेळाडूंची अतिशय चोख व्यवस्था राखण्यात आली असून स्वतः पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार या सर्व व्यवस्थांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सहभागी खेळाडूंना कसलाही त्रास होऊ नये आणि या स्पर्धांचा पूर्ण आनंद त्यांना घेता यावा, म्हणून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थापन सांभाळणाऱ्या स्वयंसेवी कार्यकर्त्यांचे अनेक गट गेले कित्येक आठवडे मेहनत घेत आहेत. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार  या राष्ट्रीय शालेय क्रिडास्पर्धांसंदर्भातील प्रशासनाच्या विविध कामांत सुसुत्रता, वेग व अचुकता आणण्यासाठी कार्यरत आहेत. या क्रिडा स्पर्धांमधे विविध क्रिडा प्रकारातील २५ राष्ट्रीय विजेते सहभागी झाले आहेत. सहभागी विद्यार्थी खेळाडूंचे चमू आणि त्यांचे कोच यांची राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था बल्लारपूर येथे क्रिडा संकुल परिसरात करण्यात आली आहे. या क्रीडा स्पर्धा स्थळी प्रवेश करताच खेळाडूंमधील ऊर्जा प्रेरणा देणारी ठरत आहे. हॅमर थ्रो, स्टीपल चेस, विविध अंतराच्या दौड स्पर्धा, थाळीफेक, गोळा फेक , अडथळ्यांची शर्यत अशा अनेक क्रीडा प्रकारात राज्या-राज्याचे क्रीडापटू समरसून सहभागी होत आहेत