बाभुळगाव येथे आक्षेपार्ह व्हॉट्सअप स्टेटटवरून तणाव

0

(Akola)अकोला: (Chhatrapati Shivaji Maharaj)छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्हाॅट्सअप स्टेटस ठेवणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी (Babhulgaon)बाभुळगाव येथे रात्री अटक केली. या घटनेनंतर तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी रात्रभर कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. तरुणाचे नाव (Ashim Khan Pathan)आशिम खान पठाण (25 वर्षे) असून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्हाॅट्सअप स्टेटस ठेवल्याचे लक्षात आल्यावर गावकऱ्यांनी आक्षेप घेत तरुणाला माफी मागण्यास सांगितले. लोक गोळा झाल्याने भीतीपोटी तो लपून बसला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर ठेवणाऱ्या युवकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी कलम 153 ‘अ’ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे पदाधिकारी व गावकऱ्यांनी आक्षेप घेत तरुणाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जाऊन माफी मागण्यास सांगितले. मात्र, भीतीपोटी तरुण लपून बसला होता. तो माफी मागण्यास तयार नव्हता. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, हे लक्षात घेऊन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. एमआयडीसी पोलिसांनी तातडीने गावात बंदोबस्त लावला. मध्यरात्रीनंतर आरोपी युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. गावात शांतता असून, पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.