S. Jaishankar statement on Bangladesh: बांगलादेशात मंदिरांना बनवले लक्ष्य

0

S. Jaishankar statement on Bangladesh
नवी दिल्ली (New Delhi,), 06 ऑगस्ट : बांगलादेशात (Bangladesh)सत्तापालटानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे. तेथील अल्पसंख्याक हिंदू समुदाय आणि मंदिरांना लक्ष्य बनवण्यात येते आहे. परंतु, आम्ही ढाका प्रशासनाच्या संपर्कात असल्याचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (Foreign Minister S. Jaishankar)यांनी आज, मंगळवारी राज्यसभेत सांगितले.

यासंदर्भात सुब्रमण्यम जयशंकर म्हणाले की, बांगलादेशातील परिस्थितीवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. सध्या तेथे अंतरिम सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बांगलादेशातील निदर्शनांदरम्यान विशेषतः हिंदू व्यावसायिकांना लक्ष्य करण्यात आले आहे. एकूण 20 हजार भारतीय बांगलादेशात आहेत. या गोंधळानंतर लगेचच आमच्या बाजूने एक ऍडव्हायझरी जारी करण्यात आली. त्यानंतर 8 हजार लोक भारतात परतले आहेत. मात्र अजूनही 12 हजार लोक तिथे अडकले आहेत. जेव्हा बांगलादेशातील परिस्थिती बिघडली तेव्हा पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधला होता. शेख हसीना भारतात येण्याची विनंती करत होत्या. त्यांना सुरक्षित रस्ता देण्यात आल्यानंतर त्या भारतात पोहचल्या. आम्ही बांगलादेशात राहणाऱ्या भारतीयांच्या संपर्कात आहोत. बांगलादेशात आरक्षणाविरोधात आंदोलन झाले असले तरी काली मंदिर आणि इस्कॉन मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांमुळे हिंदूंची चिंता वाढल्याचे जयशंकर यांनी सांगितले.

मेहेरपूरच्या इस्कॉन मंदिरावर मोठा हल्ला झाला असून तेथील मूर्तींची मोडतोड करण्यात आली आहे. याशिवाय मंदिराच्या कर्मचाऱ्यांशीही हाणामारी झाली. दोन नगरसेवकांचीही हत्या झाली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ढाका, बरीशाल, राजशाही, पिरोजपूर, चितगाव, बोगुरा आणि रंगपूर आदी भागात मंदिरांवर हल्ले झाले आहेत. इतकेच नाही तर जातीय दंगलीचा इतिहास असलेल्या नोआखलीमध्येही हिंदूंविरुद्ध हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. उल्लेखनीय आहे की 1947 मध्ये आजच्या बांगलादेशात सुमारे 25 टक्के हिंदू लोकसंख्या होती. परंतु, आता तेथे 8 टक्केच हिंदू शिल्लक आहेत.

Did S Jaishankar cleared UPSC

Jaishankar UPSC marksheet
Dr S Jaishankar UPSC rank
S Jaishankar education Qualification
S Jaishankar family
Kyoko Jaishankar
S Jaishankar children
S Jaishankar constituency