
सोलापूर – तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या स्वागतासाठी सोलापूर नगरी सज्ज झाली आहे. आज के. चंद्रशेखर राव हे सोलापूर मध्ये दाखल झाले. खबरदारी म्हणून तेलंगणा पोलीस अगोदरच सोलापुरात दाखल झाली आहे. सोलापूर मधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये के. चंद्रशेखर राव आणि सहकारी मंत्री यांचा मुक्काम असणार आहे. उद्या सकाळी ते पंढरपूरला श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत.