
(Akola)अकोला : वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीट मुळे रब्बी हंगामातील (wheat)गहू, हरभरा (gram) या सोबतच कांदा (Onion) पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अकोला, (Buldhana)बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा जमिनीतच सडला आहे. काही ठिकाणी कांदा काढण्यासाठीचा खर्चही शेतकऱ्याला परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी उभ्या कांद्यात जनावरे सोडली आहेत, दुसरीकडे काही प्रमाणात शेतकऱ्यांना कांद्याचे उत्पन्न झाले मात्र आता कांद्याला एक ते दोन रुपये किलोचा भाव मिळत असल्याने यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्याला अनुदान जाहीर केले मात्र त्याच्या जाचक अटीमुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी पात्रच ठरत नाहीत. अनेक शेतकऱ्यांनी काही प्रमाणात कांदा घरात साठवून ठेवला आहे, मात्र भाव नसल्याने आणि या कांद्याला व्यापारी घ्यायला तयार नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. खरीप हंगाम तोंडावर आल, बी बियाणे खरेदीसोबत.पेरणी कशी करावी या चिंतेने शेतकरी हवालदिल झाला आहे.