शिक्षक दिनी काळ्या फिती लावून शिक्षकांचे आंदोलन

0

 

नागपूर NAGPUR  – आदिवासी विकास विभागातील राज्यभरातील शासकीय आणि अनुदानित आश्रम शाळांमधील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले आहे. शिक्षकांनी काळ्या फिती लावून काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. यावेळी घोषणाबाजी करीत निषेध करण्यात आला. आदिवासी विकास विभागाच्या मनमानी कारभाराला शिक्षक सध्या कंटाळले आहेत. विविध मागण्या मान्य होत नसल्याने, गौरव दिनावर बहिष्कार टाकून काळा दिवस म्हणून काळ्या फिती लावून आंदोलन केले.