या मागण्यासाठी शिक्षकांचे आंदोलन

0

शिक्षणातील महत्त्वाच्या मागण्यासंदर्भात गेली अनेक दिवसांपासून महासंघ व विज्युक्टा लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आहे मात्र शिक्षण विभाग सातत्याने त्याकडे दुर्लक्ष करीत आहे, त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे हिवाळी अधिवेशनावर केलेल्या प्रचंड आंदोलनानंतर बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याचे माननीय शिक्षण मंत्र्यांनी मान्य केले होते मात्र कोणत्याही प्रकारची चर्चा व बैठक घेण्याची तसदी विभागाने घेतली नाही. त्यामुळे परत आंदोलन करायला शासनाने भाग पाडले आहे.दिनांक ९/३/२०२४ रोजी मान.जिल्हाधिकारी यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करून न्याय मागण्यांसंदर्भात विज्युक्टाचे महासचिव, (Dr. Ashok Gavankar) डॉ.अशोक गव्हाणकर,यांचे नेतृत्वात निवेदन सादर करण्यात आले.

आज सोमवार दि. 12 फेब्रुवारी 2024 ला शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मान.शिक्षक आमदार श्री.सुधाकरजी अडबाले व विजुक्टा महासचिव डॉ.अशोक गव्हाणकर यांच्या नेतृत्वात प्रचंड धरणे देऊन आंदोलन करून मान.शिक्षण उपसंचालक यांचे मार्फत शासनास निवेदन सादर करण्यात आले आहे. यानंतरही शासनाच्या संवेदना जागृत झाल्या नाही तर नाईलाजाने बोर्ड परीक्षेच्या मुल्यांकनावर बहिष्कार घालण्याची चेतावणी विज्युक्टा अध्यक्ष डाॅ.अविनाश बोर्डे व महासचिव डाॅ.अशोक गव्हाणकर यांनी दिली आहे. आंदोलनाच्या मागण्या

१) १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अर्धवेळ,विना तसेच अंशतः अनुदानावरील नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व सेवानिवृत्तांना या योजनेचा तातडीने लाभ द्यावा.
२) १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
*३) शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे १०,२०,३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना त्वरित लागू करावी
४) अघोषित उच्च माध्य. ला अनुदानासह घोषित करून अंशतः अनुदानावरील शाळा व कमवि ला प्रचलित अनुदानसुत्राने 100%अनुदान द्यावे.
५) विनाअनुदानित कडून अनुदानित मध्ये बदली स्थगिती उठवावी.
६) पायाभुत पदांना मान्यता व आय टी विषयाला अनुदान द्या
७) शिक्षकांची सर्व रिक्त पदे त्वरीत भरावीत .
८) कमवि तुकडी मान्यतेसाठी शाळा संलग्न २१ विद्यार्थी व महाविद्यालय संलग्न ३१ विद्यार्थी ग्राह्य धरावेत.संच मान्यते करिता आधार वैधतेची अट न ठेवता प्रवेशित विद्याथ्र्यांचे आधार कार्ड विचारात घेऊन संच मान्यता करावी.
९)एम.फिल.,एम.एड.,पीएच.डी. धारकांना वेतनवाढ द्या
१०) उपदानाची रक्कम २०लाख करावी निवृत्तीचे 60 वर्ष करावे.*
११) DCPS/NPS हिशेब 6व्या व 7 व्या वेतन आयोगाचे थकित हप्ते त्वरित द्यावेत.
घड्याळी तासिका शिक्षकांचे मानधन वाढवावे ,उपप्राचार्य यांना वेतन वाढ द्यावी,शुन्य कार्यभारा शिवाय शिक्षकाला अतिरिक्त करू नये. अशैक्षणिक कामे देऊ नये या व इतर मागण्यांकरिता हे आंदोलन करण्यात आले यावेळी डॉ.अशोक गव्हाणकर विजूक्टा महासचिव प्रा.डॉ.अभिजित पोटले विजूक्टा सहसचिव, मार्तंडराव गायधने,प्रा.अरविंद शरणागत,प्रा.विजय कुतरमारे,प्रा.डॉ.प्रवीण चटप,प्रा.डॉ.नितीन देवतळे,प्रा.डॉ.चेतन हिंगनेकर,प्रा.अभिजित डाखोरे,प्रा.डॉ.शालिनी तेलरांधे,डॉ.गजानन धांडे,प्रा.भाऊराव गोरे,प्रा.विवेक देशमुख,प्रा.संजय लेनगुरे,प्रा.प्रमोद भोयर, डॉ सुधीर रायपूरकर, प्रा.धर्मेंद्र मुनघटे,प्रा.प्रमोद उरकुडे,प्रा.सैंग कोहपरे, प्रा.रमेश नाकाडे,विजय गोहोकर, व विजुक्टाचे सहाही जिल्हातून आलेले प्रतिनिधी उपस्थित होते. आंदोलनाचे संचालन प्रा.भरत का ले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.गजानन धांडे यांनी केले.