शिक्षक नेते देवराव मांडवकर यांचा 5 जुलै रोजी सत्‍कार

0

 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्‍थि‍ती

नागपूर,(Nagpur) 2 जुले:- मनपा (Municipality) ताजाबाद उर्दू माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय नागपूर महानगरपालिका येथील शिक्षक आणि नागपूर महानगरपालिका(Nagpur Municipal Corporation) शिक्षक संघाचे प्रमुख सचिव देवराव कृष्णाजी मांडवकर यांचा सेवानिवृत्‍तीनिमित्‍त शनिवार, 5 जुलै रोजी सत्‍कार करण्‍यात येणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्‍थ‍िती राहील.मनपा ताजाबाद उर्दू माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे पटांगण, पीएफ ऑफ‍िसच्‍या बाजुला उमरेड रोड, नागपूर येथे सकाळी ११ वाजता होणा-या या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी माजी शिक्षक आमदार नागो गाणार राहणार आहे.

 

 या कार्यक्रमाला आमदार प्रवीण दटके, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, आ. मोहन मते, माजी शिक्षक आ. नागो गाणार, माजी आ. सुधाकर कोहळे, माजी महापौर प्रा. अनिल सोले, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, शिक्षणाधिकारी साधना सयाम, डॉ. गजेंद्र आसुटकर, विजय झलके, नागेश सहारे, सुरेंद्र टिंगणे, राजेश गवरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी माजी देवराव मांडवकर यांची नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे ‘आदर्श शिक्षक’ म्हणून ओळख असून त्यांनी मनपाचे गरीब विद्यार्थी घडवण्याकरिता अथक परिश्रम घेतले आहेत.

 

 उपक्रमशील शिक्षक असल्यामुळे ते विद्यार्थीप्रिय देखील आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा, याकरिता मनपामध्ये अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले. 13 वर्षांपासून ते शिक्षण संघाच्या प्रमुख सचिव पदावर कार्यरत असून शिक्षकांना सहावा आणि सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी त्‍यांनी आंदोलने केली. त्‍यातूनच त्यांना मनपा शिक्षक नेते म्हणून प्रसिद्धी मिळाली. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या शिक्षक नेत्याच्या सेवानिवृत्ती सत्कार सोहळ्याला विद्यार्थी,शिक्षक, पालक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.