

वर्धा : दिनांक 12 ऑक्टोबर 2025 ला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद वर्धा जिल्हा कार्यकारणीची सभा “सोनकाशी सभागृह” सुंदर नगर,आर्वी नाका वर्धा येथे संपन्न झाली. या सभेला सन्माननीय विभागीय अध्यक्ष अजय वानखेडे उपस्थित होते. तसेच विभाग अध्यक्षांनी संघटना, सदस्य नोंदणी, व पदवीधर मतदार नोंदणी यावर मार्गदर्शन केले. या सभेला जिल्हाध्यक्ष सुधीर राठोड, जिल्हा कोष्याध्यक्ष प्रदीप झलके यांनी TET परीक्षा, संघटन बांधनीवर तसेच शिक्षकां समोर येणारे अनेक प्रश्न यावर मार्गदर्शन केले.
जिल्हा कार्यवाह मारोती सयाम यांनी विषय पत्रिकेनुसार सभेचे कामकाज पार पाडले. या सभेला कपिल ठाकूर, दिपक ढगे, प्रमोद गुढधे,अनंत भाकरे,प्रफुल गरड, गोपाल सोनी,नितीन लोहकरे, प्रवीण गजभिये,शुभांगी चिकटे,सुरेखा नगराळे, माधुरी देशमुख,अर्चना धानोरकर,छाया पाहुणे,दिशा चौधरी,पवन निनावे, विठ्ठल धोटे,अनिल चौधरी सुरेश रोठे,विनोद वाटाने तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी सभेला उपस्थित होते. संचालन मारोती सयाम यांनी केले. आभार शुभांगी चिकटे यांनी मानले.