


वर्धा(Wardha) :- सेलू काटे येथील नवोदय विद्यालयात एका शिक्षकाने शाळेच्या राहत असलेल्या वसाहतीत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
संजय देवगडे असे शिक्षकाचे नाव असून ते नवोदय विद्यालय सेलू काटे येथे ट्रेड ग्रॅज्युएट टीचर म्हणून सेवारत होते.
त्यांनी कौटोंबिक कलहातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.