सव्वादोन लाख पुणेकरांची करसवलत होणार रद्द

0

पुणे, (Pune) 10 मार्च  महापालिकेकडून मागील वर्षी शासनाच्या आदेशानुसार ज्या निवासी मिळकतींची ४० टक्के कर सवलत रद्द झाली आहे. पण, या मिळकतीत मालक स्वत: घरात राहत असल्याच्या पुराव्यासह पीटी ३ अर्ज भरून देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यांना ही सवलत दिली जाणार आहे. मात्र, यातील २ लाख ९४ हजारांपैकी केवळ ६८ हजार मिळकतींचेच पीटी-३ अर्ज पालिकेस प्राप्त झाले आहेत. त्यामुळे तब्बल २ लाख २५ हजार ९०० मिळकतींची ४० टक्के सवलत २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून रद्द होणार आहे.

त्यांना नवीन वर्षाच्या बिलात मागील वर्षाचे ४० टक्के, तसेच चालू वर्षाचे ४० टक्के असे तब्बल ८० टक्के वाढीव दराचे मिळकतकर बिल दिले जाणार आहे. महापालिकेकडून १९७० पासून मिळककर आकरणी करताना संबंधित मिळकतीत स्वत: घरमालक राहत असल्यास ४० टक्के सवलत दिली जात होती. शासनाने २०११ मध्ये या सवलतीस आक्षेप घेतला. तसेच २०१८ मध्ये ही सवलत बंद करण्याचे आदेश दिले. त्यानंतर २०१९ पासून महापालिकेने नवीन मिळकतींना ही सवलत बंद केली. या मिळकतींची संख्या सुमारे १ लाख ९८ हजार आहे.