

ता प्र हिंगणा (Hingana) :- तालुक्यातील गजानन नगर येथील सार्थक शिक्षा एंड सांस्कृतिक समिति द्वारा संचालित सार्थक इंग्लिश स्कूल मध्ये विविध कार्यक्रमानी तान्हा पोळा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.
या वेळी नंदी बैलांची उत्कृष्ट रंग रंगोटी, सजावट आणि वेशभूषा असलेल्यांना संस्थेचे सचिव तथा वरिष्ठ पत्रकार लिलाधर दाभे, प्राचार्या अधिवक्ता वसुंधरा पाठक, उपप्राचार्या मरियम खान यांच्या हस्ते एक ते दहा विजेत्यांना क्रमांकाचे व इत्तरांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मरियम खान यांनी केले तर संचालन शिक्षिका कल्पना डिंबे व लक्ष्मी शरणागत यांनी केले आणि आभार प्रदर्शन शिक्षिका महिमा बडगे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता सुप्रिया मेंढे, भारती पटले, अनामिका ठाकूर, मयुरी किरनापूरे, खुशि बरडे,संतोषी उपराले, करिना खान, रूची नेवारे आदींनी अथक परिश्रम घेतले.
Hingna distance
Hingna, Nagpur