तानाजी वणवे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात प्रवेश

0
तानाजी वणवे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात प्रवेश
तानाजी वणवे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात प्रवेश

विधानसभा निवडणुकीत पराभवासोबतच नागपूर राष्टीय काँग्रेसला मोठा धक्का; तानाजी वणवे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात प्रवेश
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे, नागपूर काँग्रेस मध्ये अनेक वर्ष निष्ठावान आणि कर्तृत्ववान अशी ओळख असलेले तानाजी वणवे यांनी अजित पवार यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत दुपट्टा घालून कार्यकर्त्यांसोबत प्रवेश घेतला . या प्रसंगी राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुलभाई पटेल , प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे , निरीक्षक व माजी आमदार श्री राजेंद्र जैन उपस्थित होते.
कोण आहेत तानाजी वणवे ?
वणवे यांना महानगरपालिकेत नगरसेवक , स्थाई समिति अध्यक्ष, विरोधी पक्ष नेता ,कामगार संघटनेचे नेते म्हणून प्रदीर्घ अनुभव आहे तसेच नागपूर सुधार प्रन्यास येथे विश्वस्त होते . मॉईल कामगार संघटना संघटनेचे ते प्रतिनिधीत्व करत असून प्रदेश काँग्रेस कमेटीत महाराष्ट्र प्रदेश महामंत्री होते. यांच्या पक्ष प्रवेशामुळे पूर्व विधानसभा आणि नागपुरातील इतर मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकत वाढणार आहे.पक्ष प्रवेशाप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहिरकर , शहराध्यक्ष प्रशांत पवार , कार्यकारी अध्यक्ष श्रीकांत शिवणकर आणि असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.