

चेन्नई (CHENNAI) 14 डिसेंबर : तामिळनाडूत संसततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे राज्याच्या अनेक शहरांमध्ये पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे.राज्यात संततधार पावसामुळे थमीराबरानी नदी दुथडी भरून वाहत आहे, ज्यामुळे तुतीकोरीन जिल्ह्यातील श्रीवैकुंटम आणि इरल भागात पुराचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे त्रिचीच्या काही भागात पाणी साचले आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) तामिळनाडूसाठी अलर्ट जारी केला असून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. श्रीलंकेजवळ दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी-दाब प्रणालीचा हा परिणाम असल्याचे आयएमडीने म्हंटले असून 12 तासांत कमकुवत होण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर पुद्दुचेरी आणि कराईकल आणि इतर अनेक जिल्ह्यांतील सर्व शाळा आणि महाविद्यालये शुक्रवारी 13 डिसेंबर रोजी बंद करण्यात आली होती. तामिळनाडूच्या अनेक भागात आधीच खराब हवामानाचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. विशेषत: त्रिची शहर पाण्याखाली गेल्याचे आणि घरांमध्ये पाणी शिरले आहे.