
वाळू माफियाकडून 20 हजार रूपये लाचेची मागणी करणारा तलाठी ताब्यात
भंडारा(Bhandara), ९ मे भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीची वाळू दर्जेदार आहे. या वाळूला विदर्भात मोठीं मागणी आहे. त्यासाठी वाट्टेल तेथे वाळू चोरटे वाळूचा उपसा करतात तर ट्रॅक्टर मध्ये वाळू भरून जात असताना तलाठी वैभव जाधव याला दिसले त्यांनी ट्रॅक्टर थांबवून ट्रॅक्टर जप्त करतो नाही तर 25 हजार रूपये मला दे अशी मागणी केली. पण मालकाकडे पैसे आज नाही उद्या 20 हजार रूपये देतो असे सांगीतले. ट्रॅक्टर मालकाची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. आज सापळा रचून आरोपी तलाठी याला लाचेची रक्कम देण्यात येत असल्याने तलाठी याला संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही. त्यामुळे आरोपी वैभव जाधव याला ताब्यात घेत मोहाडी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
Related posts:
भाजप महिला आघाडी मध्य नागपूर तर्फे महिलांसाठी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन 30 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर...
October 30, 2025LOCAL NEWS
नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘शिववैभव किल्ले स्पर्धे’चा भव्य शुभारंभ
October 30, 2025LOCAL NEWS
गोरक्षण सभेत २ व ३ नोव्हेंबर रोजी सामूहिक तुलसी विवाह सोहळा
October 30, 2025LOCAL NEWS
















