
छत्रपती संभाजीनगर –Talathi Bharti तलाठी भरती प्रक्रियेमध्ये Server down सर्वर डाऊन झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राच्या बाहेर ताटकळत बसावं लागले होते. औरंगाबाद शहरातील PS College पीएस महाविद्यालयामध्ये तलाठी भरती परीक्षा आज पासून सुरू झालेली आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी सर्वर डाऊनचा फटका शेकडो विद्यार्थ्यांना बसला आहे. सर्वर डाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांचे लॉगिन होऊ शकले नाही परिणामी तब्बल अर्धा ते पाऊण तास विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राच्या बाहेर थांबावे लागले. तब्बल पाऊण तासानंतर सर्वर सुरळीत सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. परीक्षा रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी पूर्ण चाळीस मिनिटे देणार असल्याचे तहसीलदार अविनाश अंकुश यांनी सांगितले.
Related posts:
म.न.पामध्ये मोठा घोटाळा! निवासी भूखंडावर बहुमजली हॉस्पिटलचे बांधकाम मंजूर
October 31, 2025Breaking news
रेलवे पुलिस की तत्परता से महिला यात्री को मिला खोया हुआ बैग
October 25, 2025MAHARASHTRA
कळमेश्वर गोंडखैरी उड्डाणपूलास मंजुरी-डॉ. राजीव पोतदार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश
October 23, 2025MAHARASHTRA















