नागपूर-राज्य सरकारचा चहा घेतल्यास तो संकटात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांप्रती द्रोह ठरेल. त्यामुळे आम्ही सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकल्याचा दावा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय.
अवकाळीचे संकट, दुष्काळ, पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रु दाटले आहेत. अशा स्थितीत सरकारच्या चहापानाला उपस्थित राहणे आम्हाला योग्य वाटत नाही. तो शेतकऱ्यांप्रती द्रोह ठरेल, असे ते म्हणाले. राज्यावरील वाढलेले, कर्ज, शासकीय रुग्णालयांतील मृत्यूतांडव, आरक्षणाबाबतची असंवेदनशीलता, अल्पसंख्याकाबाबत नकारात्मक दृष्टीकोन, वाढती बेरोजगारी, कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे, स्थानिक स्वराज्य संस्थांवरील प्राशसक राज, , विदर्भातील कापूस व धान उत्पादक शेतकऱ्यांवरीील संकट असे अनेक मुद्दे आम्ही अधिवेशनात मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारमधील अंतर्गत मतभेद, मंत्र्यांची विसंगत विधाने, हेवेदावे यामुळे प्रशासनाने तीन तेरा वाजले आहेत. चोर चोर भाऊ-भाऊ अशी सरकारची अवस्था आहे, असेही ते म्हणाले.
















