

विदर्भ साहित्य संघ आणि सर्जना निर्माण यांचे आयोजन
विदर्भ साहित्य संघ आणि सर्जना निर्माण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्र-शिल्प रसग्रहण व्याख्यानमालेच्या रौप्य महोत्सवी सत्राचे आयोजन विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलातील अमेय दालनात (चौथा मजला) शुक्रवार, 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता करण्यात आले आहे.
शंख, चक्र, गदा, कमळ, गजलक्ष्मी, नटेश्वर, त्रिशूल, अग्नी ही आणि अशीच भारतीय संस्कृतीची प्राचीन प्रतीके आहेत. आधुनिक युगातील चित्रकारांनी या प्रतीकांचा उपयोग कसा आणि कोणत्या शैलीत केला, हा विषय घेऊन ‘संस्कृतीची प्रतीके आणि आधुनिक चित्रकला’ या विषयावर दोन व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.
चित्रकार आणि चित्रकलेच्या इतिहासाचे प्राध्यापक चंद्रकांत चन्ने हे ‘बंगाल स्कूल’ या विषयावर तर, प्रा. विनोद चव्हाण हे ‘तांत्रिक काळ’ या विषयावर आपले विचार व्यक्त करतील. या कार्यक्रमास रसिक नागरिकांनी अगत्यपूर्वक उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.