स्वाइन फ्लू ने घेतला दुसरा बळी

0

रुग्णांना माहिती देणे केले बंधनकारक

नाशिक  (Nashik) : नाशिक मध्ये स्वाईन फ्लूचा उद्रेक सुरूच असून पुन्हा एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये स्वाईन फ्लू ची तीव्रता काही कमी होताना दिसत नाहीये मागील आठवड्यामध्ये सिन्नर येथील दातली गावातील महिलेचा मृत्यू झाला होता .त्यानंतर महापालिका वैद्यकीय अधिकारी तानाजी चव्हाण यांनी सर्वांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले होते.

पुन्हा एकदा नाशिक मध्ये खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या मालेगाव येथील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे ही महिला पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्यानंतर या महिलेला मालेगाव वरून तातडीने नाशिक मधील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते तेथे उपचार सुरू असताना या महिलेचा मंगळवारी उशिरा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नाशिकमधील स्वाइन फ्लूचा उद्रेक काही थांबता थांबेना.

याबाबत बोलताना महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांनी सांगितले की, शहरांमध्ये स्वाइन फ्लू नये डोकं वर काढू नये यासाठी महानगरपालिकेचे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे सर्व रुग्णांना नोटीस पाठवून दर आठवड्याला स्वाईन फ्लू बाबतचा अहवाल सादर करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे अहवाल सादर केला नाही किंवा टाळाटाळ केल्यास थेट कारवाई केली जाणार आहे.