

नागपूर, (Nagpur)30 सप्टेंबर
वकील, उद्योजक असलेल्या जलतरणपटू ॲड. श्रुती गांधी यांनी मास्टर्स स्विमिंग स्टेट चॅम्पियनशिपमध्ये 45 ते 50 वर्षे वयोगट चमकदार कामगिरी केली असून त्यांनी दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य अशी एकुण 5 पदके पटकावली आहेत. त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत त्यांनी 100 मीटर आणि 50 मीटर बॅक स्ट्रोक इव्हेंटमध्ये दोन सुवर्णपदके, 4×100 मिडले रिलेमध्ये आणि 200 मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेत रौप्य पदक तसेच, 400 फ्री स्टाईल मध्ये कांस्य पदके पटकावले.
अॅड. श्रुती गांधी या विझकिडच्याच्या संचालिका आहेत. सीए विनोद गांधी यांच्या पत्नी असलेल्या अॅड. श्रुती यांनी व्यवसाय सांभाळून आपली पोहण्याची आवड जोपासली आहे.
नागपूर जिल्हा वेटरन्स स्विमिंग असोसिएशनचे अध्यक्ष अमित सावजी, सचिव अखिल मंत्री, समिती सदस्य, सर्व माहेश्वरी संस्था, मित्र आणि नातेवाईकांनी त्यांचे अभिनंदन केले व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.