स्वामी विवेकानंद पतसंस्था , नागभीड च्या निवडणुकीत सहकार पॅनल चे वर्चस्व

0

नागभीड (NAGBHID):
1994 साली स्थापन झालेल्या स्वामी विवेकानंद नागरी पतसंस्थेच्या आज दिनांक 5 एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीत सहकार पॅनल चे ओबीसी गटातून प्राचार्य देविदास मुकुंदराव चिलबुले यांनी 560 मतदान घेत विरोधी गटाचे भास्कर अमृतकर यांचा पराभव केला.. तर सर्वसाधारण महिला गटातुन सहकार पॅनल च्या सौ. कांचन दिवाकर चिलबुले यांनी 560 व सौ. सुनीता उमेश चिल्लुरे यांनी 536 मतदान घेत विरोधी गटाच्या सौ. निर्मला रेवतकर यांचा पराभव केला.
अकरा संचालकीय मंडळ असलेल्या या पतसंस्थेच्या निवडणुकीत सर्वसाधारण गटातून इतर उमेदवारांनी आपले नामांकन परत घेतल्याने सहा संचालक अविरोध निवडून आले त्यामध्ये अजय रमेशचंद्र काबरा,जहांगीर युसूफ कुरेशी,संजय शिवराम ठाकरे,रमेश बाळकृष्ण ठाकरे,सुरेश वामनराव अनमूलवार,संजय विठ्ठलराव घोनमोडे हे निवडून आलेत तर अनुसूचित जाती गटातून शंकर मनोहर मशाखेत्री , भटक्या विमुक्त प्रवर्ग गटातून विजय मधुकर बंडावार हे अविरोध निवडून आले होते.

ओबीसी गटातून व महिला राखीव गटातून नामांकन परत न घेतल्याने ही निवडणूक झाली होती.. नोव्हेंबर 2023 मध्ये सदर पतसंस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती..
आज झालेल्या निवडणुकीत संस्थापक व माजी अध्यक्ष संजय गजपुरे , ॲड. रविन्द्र चौधरी यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात तिन्ही उमेदवारांनी एकहाती विजय मिळविल्याने या पतसंस्थेवर पुन्हा एकदा सहकार पॅनल चे वर्चस्व निर्माण झाले आहे.आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या सह नगरपरिषद चे माजी अध्यक्ष डॅा. उमाजी हिरे , उपाध्यक्ष गणेश तर्वेकर , गुलाबराव भानारकर , प्रा . लोमेश दुधे , अतुल वऱ्हाडे व अनेकांनी अभिनंदन केले आहे.