

(Bhandara)भंडारा: लहान बहिणीचे गावातीलच एका तरुणासोबत प्रेमसबंध असल्याच्या संशयावरून भावाने बहिणीचा गळा आवळून खून केल्याची दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील सोनुली गावात घडली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी भावाला अटक केली.
(Brother arrested in sisters murder case)
आरोपी (Ashish Gopichand Bawankule)आशिष गोपीचंद बावनकुळे (२२) याला त्याची
लहान बहीण अश्विनी (वय २०) ही गावातीलच एका तरुणाच्या प्रेमात पडल्याचा संशय होता. यातून बहीण भावांमध्ये नेहमी खटके उडायचे. त्यातून आरोपी आशिष याने बहिणीची हत्या केली व ती लपवण्याचा प्रयत्न केला. बावनकुळे
कुटुंबियांनी मुलीचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा बनाव करीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, वरठीचे ठाणेदार अभिजित पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून आणि कुटुंबियांच्या उडवाउडवीच्या उत्तरानं पोलिसांना संशय आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवून जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतदेहाचं शवविच्छेदन केल्यानंतर सत्य समोर आले. मृत तरुणीची गळा आवळून हत्या झाली असल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे.