

(New Dellhi)नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकप्रियता अद्यापही कशी टिकून आहे, याची प्रचिती अलिकडेच अमेरेकितील थिंक टँक मानल्या जाणाऱ्या प्यू रिसर्च सेंटरकडून (Pew Research Center) भारतात करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून आली आहे. (Prime Minister Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी चांगले काम करीत असल्याचा विश्वास देशातील ८० टक्के लोकांना वाटत आहे. दहापैकी ८ भारतीयांची त्यांच्याबद्दल चांगली मत आहेत, असेही या सर्वेक्षणात आढळून आले आहे.
२०२४ लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हे सर्वेक्षण पार पाडण्यात आले आहे. दहा पैकी ७ भारतीयांनी जगावर भारताचा प्रभाव पूर्वीपेक्षा वाढल्याचे मत व्यक्त केले आहे. भारताची आर्थिक स्थिती कमकूवत असल्याचे मत केवळ १९ टक्के लोकांनी नोंदविले आहे तर १३ टक्के लोकांना भारताच्या परिस्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नाही, असे वाटते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दलही सर्वेक्षणाचे निरीक्षण मांडले गेले आहेत. १० पैकी ६ भारतीयांना (Rahul Gandhi )राहुल गांधींविषयी अपेक्षा आहेत. ते चांगलं काम करतील, असे त्यांना वाटते. विरोधी पक्षाचे नेते म्हणून राहुल गांधींच्या कामावर १० पैकी ६ लोक समाधानी आहेत, असे सर्वेक्षण सांगते. मात्र, राहुल गांधींच्या भूमिकेमुळे प्रभावीत न झालेल्या लोकांची टक्केवारी ३४ टक्के इतकी आहे.