(Mumbai)मुंबई- (Actor Sushant Singh Rajput)अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि (Disha Salian)दिशा सालियन मृत्यूप्रकरणावर सीबीआयकडून पुरावे गोळा करण्याचे काम वेगाने सुरुच असल्याची माहिती उपमुख्यमंत्री ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis) दवेंद्र फडणवीस यांनी दिली. सगळे पुरावे जमा झाले की मग आम्ही हे प्रकरण उजेडात आणणार आहोत. जर त्या पुराव्यात तथ्य असेल तर त्यानुसार कारवाई केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
फडणवीस यांनी सांगितले की, आम्ही काही रेकॉर्डिंग देखील केले आहे. त्यासाठी काही पुरावे गोळा केले आहेत. त्यामुळे आता कोणत्याही गोष्टीवर आताच बोलणे योग्य होणार नाही, असेही ते म्हणाले.
















