

केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री श्री. जी. किशन रेड्डी ह्यांच्या हस्ते सुरजागड आयर्न ओर माइन्स येथे कार्यचालनातील उत्कृष्टता आणि हरित नवोपक्रमासाठी ५-स्टार रेटिंग चा स्वीकार करताना लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे अधिकारी. केंद्रीय कोळसा आणि खाण राज्यमंत्री श्री. सतीश चंद्र दुबे; आयबीएमचे प्रभारी महानियंत्रक श्री. पीयूष नारायण शर्मा; आयबीएमचे मुख्य खाण नियंत्रक श्री. पंकज कुलश्रेष्ठ, या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) च्या सुरजागड लोहखनिज ((mineral conservation) ) खाणीने केंद्रीय खाण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत इंडियन ब्युरो ऑफ माइन्स (आयबीएम) कडून प्रतिष्ठित ५-स्टार रेटिंग मिळवून गडचिरोली जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. ७ जुलै २०२५ रोजी जयपूर येथील राजस्थान आंतरराष्ट्रीय केंद्रात झालेल्या समारंभात केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री श्री. जी. किशन रेड्डी यांनी एलएमईएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ५-स्टार रेटिंग स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान केले.
२०२३-२४ या वर्षात कार्यचालनातील उत्कृष्टता आणि हरित नवोपक्रमात अत्युत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सुरजागड खाणीला हा राष्ट्रीय सन्मान मिळाला आहे. श्री. रेड्डी यांनी केंद्रीय कोळसा आणि खाण राज्यमंत्री श्री. सतीश चंद्र दुबे; भारतीय खाण ब्युरोचे प्रभारी महा नियंत्रक श्री. पीयूष नारायण शर्मा; आयबीएमचे मुख्य खाण नियंत्रक श्री. पंकज कुलश्रेष्ठ यांच्या उपस्थितीत एलएमईएलच्या अधिकाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान केला.
केंद्रीय खाण मंत्रालयाने (Union Ministry of Mines) शाश्वत विकास मार्गदर्शक तत्त्व (एसडीएफ) लागू करण्यासाठी खाणींच्या स्टार रेटिंगची एक प्रणाली विकसित केली आहे. सर्व मॉड्यूलमध्ये ९०% किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या खाणीला प्रतिष्ठित पंचतारांकित रेटिंग दिले जाते. ५-स्टार रेटिंगमुळे सुरजागड लोहखनिज खाण एसडीएफ अंतर्गत शाश्वत आणि पर्यावरणपूरक खाणकामाचे एक चमकदार उदाहरण म्हणून नावारूपास येत आहे.
सदर उपलब्धीबाबत आनंद व्यक्त करताना, एलएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन म्हणाले की, स्थानिक समुदायाचा पाठिंबा आणि एलएमईएल चमू च्या कटीबद्धतेमुळेच हे यश मिळविणे शक्य झाले आहे. ते पुढे म्हणाले, “खाण मंत्रालयाने विकसित केलेल्या एसडीएफ अंतर्गत प्रतिष्ठित पंचतारांकित रेटिंग मिळणे ही एलएमईएल आणि गडचिरोलीच्या लोकांसाठी खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय (Environment-friendly) घटकांवर प्रतिकूल परिणाम न करता समावेशक विकासाप्रतिची आमची वचनबद्धता ह्या उपलब्धीतुन प्रतिबिंबित होते. गडचिरोली जिल्ह्यात हरित पोलाद निर्मितीचे स्वप्न साकार करण्यासाठी अधिक उत्साहाने काम करण्याची ऊर्जा आम्हाला ५-स्टार रेटिंग मुळे मिळाली आहे.”
गेल्या दोन वर्षांपासून वार्षिक १० दशलक्ष टन क्षमतेच्या सुरजागड लोहखनिज खाणी चालवण्यात कार्यचालनातील उत्कृष्टता आणि हरित नवोपक्रमाला पंचतारांकित रेटिंगने राष्ट्रीय मान्यता दिली आहे. पर्यावरणपूरक खनिकर्म उपक्रमांतर्गत बॅटरीवर चालणारी जड उपकरणे, एलएनजी वाहने (LNG vehicles) , आणि जगातील पहिल्या इलेक्ट्रिक कॉम्प्रेसर एक्स्कॅव्हेटर-माउंटेड ड्रिलसह विद्युतचलित ड्रिलच्या वापरावर भर देण्यात आला आहे. हवा, पाणी आणि कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात सर्वोत्तम पर्यावरणीय शाश्वतता पद्धतींचे एलएमईएल पालन करते.
एलएमईएल चा सकारात्मक परिणाम खाणकामापलीकडे सामाजिक-आर्थिक परिवर्तनाच्या क्षेत्रात दृश्यमान आहे. हेडरी येथील CBSE-संलग्न लॉयड्स राज विद्या निकेतन शाळा, लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलमधील आधुनिक आरोग्य सुविधा, स्थानिक महिलांनी चालवलेले ‘वन्या’ कपडे उत्पादन युनिट, वाहनचालक प्रशिक्षण संस्था, क्रीडा प्रशिक्षण सुविधा, कौशल्य प्रशिक्षण उपक्रम, स्थानिक समुदायांचे सक्षमीकरण इत्यादी विविध उपक्रमांद्वारे आदिवासी समुदायांमध्ये सामाजिक-आर्थिक पुनर्जागरणाला चालना देण्याचे काम एलएमईएल ने केले आहे.