

नागपूर(Nagpur) -रामटेक लोकसभा मतदारसंघासात (In Ramtek Lok Sabha Constituency) काँग्रेसतर्फे रश्मी बर्वे यांचा नामांकन अर्ज रद्द झाल्यानंतर त्यांचे पती श्यामकुमार उर्फ बबलू बर्वे उमेदवार झाले असताना काँग्रेसचे गेल्यावेळी निवडणूक लढलेले माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये आज नॉट रिचेबल असल्याने काँग्रेसची चिंता वाढली आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे विदर्भ संघटक सुरेश साखरे हे आज अर्ज मागे घेणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली. साखरे यांच्या उमेदवारी माघारीचा मविआला निश्चितच दिलासा मिळणार आहे. ल आज उमेदवारी माघारीच्या वेळेनंतरही गजभिये मैदानात राहिल्यास त्याचा फटका निश्चितच काँग्रेसच्या मत विभाजनात होऊ शकतो. शनिवारी दुपारी तीन वाजतानंतर रामटेक लोकसभा मतदारसंघातील लढतीत नेमके कोण याविषयीचा तिढा सुटणार आहे. सध्या रामटेकच्या मतदारसंघात 35 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
वैध उमेदवारांमध्ये राजू पारवे (शिवसेना), श्यामकुमार बर्वे (इंडियन नॅशनल काँग्रेस), संदीप मेश्राम (बहुजन समाज पार्टी), आशिष सरोदे (भीमसेना), उमेश खडसे (राष्ट्र्र समर्पण पार्टी), मंजुषा गायकवाड (अखिल भारतीय परिवार पार्टी), गोवर्धन कुंभारे (वीरो के वीर इंडियन पार्टी) , प्रमोद खोब्रागडे (आंबेडकरराईट पार्टी ऑफ इंडिया), ॲड. भीमराव शेंडे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), भोजराज सरोदे (जय विदर्भ पार्टी), रिध्देश्वर बेले (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)), रोशनी गजभिये (गोंडवाना गणतंत्र पार्टी ), शंकर चहांदे (वंचित बहुजन आघाडी), सिध्दार्थ पाटील (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक), संजय बोरकर (महा -राष्ट्र विकास आघाडी ), संविधान लोखंडे (बळीराजा पार्टी ), अजय चव्हाण (अपक्ष ), अरविंद तांडेकर (अपक्ष), ॲड. उल्हास दुपारे (अपक्ष), मा.कु.कार्तिक डोके (अपक्ष), किशोर गजभिये (अपक्ष), गोवर्धन सोमदेवे (अपक्ष), गौरव गायगवळी (अपक्ष), सौ.दर्शनी धवड (अपक्ष), नरेश बर्वे (अपक्ष) , प्रकाश कटारे (अपक्ष), प्रेमकुमार गजभारे (अपक्ष), सुरेश लारोकर (अपक्ष), डॉ.विनोद रंगारी (अपक्ष), विलास झोडापे (अपक्ष), सुनील साळवे (अपक्ष), सुभाष लोखंडे (अपक्ष ), सुरेश साखरे (अपक्ष ), संदीप गायकवाड (अपक्ष), विलास खडसे (अपक्ष) यांचा समावेश आहे.