
मुंबई MUMBAI – राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP सर्वेसर्वा शरद पवारांच्या SHARAD PAWAR दाखल्यावर ‘ओबीसी’ OBC असा उल्लेख असल्याचा दावा सोशल मीडियावर सुरु असतानाच राष्ट्रवादीचा शरद पवार गट तसेच त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी हा दावा हास्यास्पद असल्याचे स्पष्ट केले आहे. असा उल्लेख असणारे प्रमाणपत्रच मुळात बनावट असून हा त्यांना बदनाम करण्याचा कट असल्याचा आरोप त्यांनी केलाय.SUPRIYA SULE
एवढ्या मोठ्या नेत्याला बदनाम करण्यासाठी कारस्थान रचले जात आहे. ते अत्यंत चुकीचे आहे. महाराष्ट्रातल्या अशा लोकांना कुठूनतरी रसद पुरवली जात आहे. व्हायरल होत असणारा दाखला हा या कारस्थानाचा भाग असल्याचे त्या म्हणाल्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या की हा सगळा प्रकार हास्यास्पद आहे. शरद पवार दहावीला होते, त्यावेळेस इंग्रजीमधून प्रमाणपत्र दिले जात नव्हते. पवार दहावीला होते, तेव्हा त्यांचा दाखला इंग्रजीत असू शकतो का? आजकाल खोटी प्रमाणपत्रे बाजारामध्ये सर्रास मिळतात, असे त्या म्हणाल्या.