Rahul Narwekar ठाकरे गटाची विधानसभा अध्यक्षांविरुद्ध तक्रार

0

मुंबई  Mumbai : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे पक्षपातीपणा, वेळकाढूपणा करीत असल्याची तक्रार ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी केली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करणारे पत्र त्यांनी विधिमंडळ सचिवालयास लिहिले आहे.(Sunil Prabhu Complaint Against Assembly Speaker). अध्यक्ष नार्वेकर हे शिंदे गटाला झुकते माप देतात, असा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे.

साक्ष, पुरावे, प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी ठराविक वेळ दिलेली असतानाही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) शिंदे गटाला वाढीव वेळ देऊन कारवाई लांबवत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. २१ जूनच्या बैठकीसाठी बजावलेल्या व्हिपवरून काल दिवसभर प्रभूंना शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी घेरले. व्हिप बजावण्यातच आला नव्हता, असा दावा काल सुनावणीदरम्यान महेश जेठमलानींनी केला. त्यावर उत्तर देताना प्रभूंनी तो दावा फेटाळला.