

“भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध होऊन न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या (Former Congress MLA Sunil Kedar)कॉंग्रेसचे माजी आमदार सुनील केदार यांचा फोटो नागपूर जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पावर होता. त्याचा निषेध म्हणून भाजपा सदस्यांनी जिल्हा परिषद सभागृहाबाहेर त्याची होळी केली. निषेधाचा हा सनदशीर मार्ग असताना देखील, भाजपा सदस्यांना जाणीवपूर्वक निलंबित करण्यात आले. तसेच, भ्रष्टाचाराने बरबटलेल्या सुनील केदार यांच्या आदेशावरून विकासपुरुष, देशाचे ( Prime Minister Narendra Modi)पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या फोटोला काळे फासण्याचा निंदनीय प्रकार युवक कॉंग्रेसने केला. या सगळ्या प्रकारांच्या निषेधार्थ, आम्ही सर्व संतप्त नागपूर जिल्हा भाजपा कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले आहे. मोदीजींचा अपमान देश सहन करणार नाही.
सुनील केदार हे भ्रष्टाचारात दोषी ठरले आहेत. त्यांना पाच वर्षाची शिक्षा झाली आहे. ते तात्पुरत्या जामिनावर बाहेर आहेत. त्याचा गैरफायदा घेत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना थांबविण्याचे काम सुनील केदार करत आहेत. त्यांनी आधी शेतकऱ्यांचे पैसे लुबाडले. मोदीजींच्या लोकहिताच्या योजना त्यांनी जनतेपर्यंत पोहोचू दिल्या नाहीत. याचा मी निषेध करतो. न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यामुळे त्यांना ५ वर्षे जेलमध्ये राहावे लागणार आहे. ते ६ वर्षे निवडणूक देखील लढवू शकणार नाहीत. केदारांनी जामीनाचे उल्लंघन केले आहे. सरकारने कोर्टात जाऊन त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. एका भ्रष्टाचाऱ्याचे मुख्य अतिथी म्हणून जिल्हा परिषद शाळेत भाषण करणे कितपत योग्य आहे? लहान-लहान विद्यार्थ्यांसमोर ते काय आदर्श मांडणार आहेत? महिला मेळाव्यात ते काय मार्गदर्शन करणार? जिल्हा परिषद प्रशासनाला इशारा आहे की, सुनील केदारांना कोणत्याही कार्यक्रमात बोलावू नये. अन्यथा जिल्हा परिषद बरखास्त करण्याची मागणी करण्यात येईल. रेती माफिया, महाभ्रष्टाचारी सुनील केदार यांना वठणीवर आणण्याची गरज आहे. मोदीजींच्या नेतृत्वात आपला देश ‘विकसित देशाच्या’ मार्गावर आहे.
आमची मागणी आहे की, घटनात्मक पदावर असलेले देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या फोटोला काळे फासणाऱ्या काँग्रेसी माथेफिरूंना अटक करून त्यांना शिक्षा व्हावी. तसेच, कोर्टाने शिक्षा ठोठावलेले काँग्रेसचे माजी आमदार सुनील केदार यांची प्रतिमा जिल्हा परिषद कार्यालयातून त्वरित हटवण्यात यावी. कॉंग्रेसचा भ्रष्टाचार सर्व देशाला माहित आहे. कॉंग्रेस नागपूर जिल्हा परिषदेचासुद्धा गैरवापर करत आहे. सुनील केदार भ्रष्टाचारी आहेत, हे सिध्द झाले आसतानासुद्धा त्यांच्या सांगण्यावरून कामे सुरु आहेत”, असे वक्तव्य भाजपाचे सह-मुख्य प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्याचे ओबीसी मोर्चा प्रभारी माजी आमदार डॉ. आशिषराव र. देशमुख यांनी केले. भाजपातर्फे नागपूर जिल्हा परिषद कार्यालयासमोर आयोजित ‘तीव्र निषेध आंदोलनात’ ते बोलत होते. देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या होर्डींगला जाणीवपूर्वक काळे फासणाऱ्या काँग्रेसी कार्यकर्त्यांना त्वरीत अटक करून शिक्षा करा आणि कोर्टाने शिक्षा ठोठावलेले काँग्रेसचे माजी आमदार सुनील केदार यांची प्रतिमा जिल्हा परिषद कार्यालयातून त्वरीत हटवण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन दि. ०५ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आले होते.
यावेळी भाजपाचे (Mr. Sudhakar Kohle)श्री. सुधाकर कोहळे, (MLA Sameer Meghe)आमदार समीर मेघे, (MLA Praveen Datke)आमदार प्रवीण दटके, आमदार सुधीर पारवे, डॉ. मिलिंद माने, श्री. मल्लिकार्जुन रेड्डी, डॉ. राजीव पोद्दार, बंटी कुकडे, नागपूर जिल्ह्यातील भाजपाचे अनेक नेते आणि हजारो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. अनेक नेत्यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले.