Sunil Kedar : सुनील केदार यांनी तरुण पिढी केली बर्बाद

0

22 वर्षांपूर्वी केलेल्या करोडोंच्या बॅंक घोटाळ्यामुळे पिडीत शेतकरी व खातेदारांच्या परिवारातील एक तरुण पिढी सुनील केदार यांनी बर्बाद केली..!
डॉ. आशिषराव र. देशमुख (Dr. Ashishrao R. Deshmukh)

नागपूर  (Nagpur )सुनील केदार  (Sunil kedar)यांनी 22 वर्षांपूर्वी केलेल्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 153 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात वसुलीच्या कारवाईसाठी राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे टाळाटाळ करीत आहेत. उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी गरिबांचा पैसा वसूल करण्यात पुढाकार घ्यावा. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे अडथळे निर्माण करत असतील तर त्यांना मंत्रीपदावरून हटवावे, अशी मागणी सावनेर येथील बेमुदत ठिय्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी (दि. 03 ऑगस्ट 2024) करण्यात आली. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा पिडीत शेतकरी व खातेदार संघटना, सावनेरतर्फे दि. 02 ऑगस्ट 2024 पासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे.

बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुनील केदार यांच्याकडून घोटाळ्याचे 153 कोटी व व्याजाचे 1444 कोटी रुपयांची वसुली करून पिडीत शेतकरी व खातेदारांना 2 महिन्यात वाटप करण्यात यावे, ही प्रमुख मागणी पिडीत आंदोलनकर्त्यांची असून भाजपाचे ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी डॉ आशिषराव र. देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरु आहे.

“नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवलेले काँग्रेसचे घोटाळेबाज माजी आमदार सुनील केदार यांच्याकडून घोटाळ्याचे 1444 कोटी रुपये सहकारी संस्था अधिनियम 1966 चे कलम 88 अंतर्गत वसूल करायचे आहेत. परंतु, राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या वसुली प्रक्रियेला दोनदा स्थगिती दिली. या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन सुनील केदार यांच्याकडून वसुलीची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, जेणेकरून 2 महिन्यात पिडीत शेतकरी व खातेदारांना त्यांचे पैसे वाटप करता येईल. सुनील केदार यांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मागील 22 वर्षांपासून हजारो शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर कामगार, नोकरदार, व्यापारी बांधव भोगत आहेत. जिल्हा बँकेतून कर्ज मिळत नाही म्हणून अनेक शेतकऱ्यांना सावकाराचा रस्ता धरावा लागला.

कर्जाचा बोजा वाढल्यामुळे आलेल्या नैराश्यातून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. नागपूर जिल्ह्यात मागील काही वर्षांमध्ये झालेल्या शेतकरी आत्महत्यांसाठी काँग्रेसचे घोटाळेबाज माजी आमदार सुनील केदारच जबाबदार आहेत. याचे गंभीर परिणाम पिडीत परिवार आणि येणाऱ्या पिढीला भोगावे लागले. 22 वर्षांपूर्वी केलेल्या करोडोंच्या बॅंक घोटाळ्यामुळे पिडीत गरीब शेतकरी व खातेदारांच्या परिवारातील एक तरुण पिढी सुनील केदार यांनी बर्बाद केली. पिडीत शेतकरी व खातेदारांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन संपणार नाही”, असा इशारा डॉ. आशिषराव र. देशमुख यांनी यावेळी दिला.

याप्रसंगी माजी मंत्री श्री. रणजीतबाबू देशमुख, मनोहर कुंभारे, ओमप्रकाश कामडी, अॅड.अरविंद लोधी, दिलीप धोटे, धनराज देवके, प्रमोद पिंपळे, स्वप्नील चौधरी, श्रीमती अमीन ताई, उज्वल कराडभजने, नारायण ठाकरे, रामचंद्र जिचकार, डॉ. डोंगरे, शांताराम गावंडे, विजय देशमुख, प्रफुल्ल मोहोटे, मनोज निंबाळकर, अरविंद गजभिये, अॅड.चंद्रशेखर बरेठीया, अशोक तांदूळकर, मंगेश कोठाडे, मंदार बावनकर, गंगाधर नागपुरे, देविदास मदनकर, ज्ञानेश्वर गुडधे, रामराव मोवाडे इत्यादी मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते. मान्यवरांनी आपले मत यावेळी व्यक्त करून सुनील केदार यांच्यावर रोष व्यक्त केला. हजारोंच्या संख्येत नागरिक या आंदोलनात सहभाग झाले आहेत.