

नागपूर NAGPUR : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक Nagpur District Central Government Bank रोखे घोटाळ्यात दोषी आढळल्याने व 5 वर्षाची कारावासाची शिक्षा झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व Sunil Kedar माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी अखेर रद्द करण्यात आली आहे. विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे यांनी यासंदर्भात राजपत्रित अधिसूचना जारी केली आहे. 22 डिसेंबर पासून याचा प्रभाव असणार आहे. शुक्रवारी जेएमएफसी न्यायालयाने त्यांना या घोटाळ्यात पाच वर्षांच्या कारावासाची व 12.50लाख रुपयांची शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे केदार यांच्यापुढे राजकीय संकट निर्माण झाले. तीन वर्षापेक्षा अधिकची शिक्षा असल्याने त्यांना मंगळवारी जिल्हा सत्र न्यायालयात जामीन प्रक्रिया करावी लागणार आहे.
सुमारे 152 कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्यात न्यायालयाने त्यांच्यासह सहा जणांना दोषी ठरविले आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कोणत्याही खटल्यात दोन वर्षांपेक्षा अधिक काळासाठी तुरुंगवासाची शिक्षा झाल्यास आमदारकी रद्द होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे भाजपने ही मागणी केली, कायदेशीर बाबी पूर्ण होताच हा निर्णय घेतला गेला. दरम्यान, सावनेर मतदारसंघात काँग्रेस आमदार सुनील केदार यांचे भाजपकडून प्रतिस्पर्धी उमेदवार असलेले माजी अध्यक्ष डॉ राजीव पोतदार, दुसरे दावेदार माजी आमदार डॉ आशीष देशमुख यांनी पत्रपरिषदेतून या न्यायालयीन निर्णयाचे स्वागत केले होते व आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती.