बारामती लोकसभेत सुप्रियांच्या विरोधात सुनेत्रा पवार?

0

पुणे: भाजपने पवारांच्या बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. यंदा बारामती जिंकण्याचे भाजपचे जोरकस प्रयत्न सुरु असून त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या (Political Speculation over Sunetra Pawar`s political entry) विरोधात मैदानात उतरविणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यासंदर्भात अद्याप कुठूनही या चर्चेला दुजोरा मिळालेला नाही.
भाजपने राज्यातील सर्वच मतदारसंघांवर फोकस केला आहे. प्रत्येक मतदारसंघाचे बारीसारीक नियोजन सुरु आहे. त्यातच सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरविण्याची चर्चा सुरु आहे. मात्र, त्या खरोखरच सुप्रिया सुळे यांच्या विरोधात मैदानात उतरणार की कसे, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. याhtjdbr खासदार सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार लढणार अशी चर्चा सुरु होती. पण अचानक सुनेत्रा पवारांची चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या सलग तीन वेळा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार राहिल्या आहेत.