सुखबीर बादल सिंग यांचावर झाला जीवघेणे हल्ला

0

अमृतसर (Amritsar), 04 डिसेंबर:  शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल (Sukhbir Singh Badal) यांच्यावर पंजाबमधील अमृतसरमध्ये हल्ला झाला. सुवर्ण मंदिरात त्याच्यावर गोळी झाडण्यात आली आहे. श्री अकाल तख्त साहिबने दिलेल्या धार्मिक शिक्षेसाठी ते श्री हरमंदिर साहिबला दरबारामध्ये आहेत. त्यांच्या अनुयायांनी वेळेवर संशयिताला पकडल्याने बादल बचावले. यानंतर पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली. सेवादाराच्या भूमिकेसाठी सुखबीर सिंग बादल मुख्य गेटवर तैनात असताना सकाळी ९ नंतर ही घटना घडली. दरबार साहिबमध्ये गोळीबाराच्या आवाजाने मंडळींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, नारायण सिंह चड्डा असे संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपी डेरा बाबा नानकचा असून दल खालसाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. गोळीबार केल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला तात्काळ पकडले. पोलिसांनी आरोपीचे हात वर केल्याने हवेत गोळी झाडण्यात आली. ही घटना मुख्य गेटसमोर घडली.