वर्ल्ड कप गमावल्याच्या दुःखात आत्महत्या

0

कोलकाता-क्रिकेट वर्ल्ड कप गमावणे हा क्रिकेटच्या चाहत्यांसाठी मोठाच धक्का ठरला आहे. वर्ल्ड कप गमावल्याच्या दुःखातून दोन तरुणांनी आत्महत्या केल्याचे प्रकार पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये उघडकीस आले आहेत. (Cricket Fans Suicide)
रविवारी पार पडलेल्या फायनलच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. त्यानंतर पश्चिम बंगालच्या बांकुरा येथील राहुल लोहार (वय 23) या तरुणाने सामना संपताच रात्री अकरा वाजताच्या सुमारास आत्महत्या केली. त्याने आपल्या रुममध्ये जाऊन गळफास घेतल्याची माहिती आहे. ओडिशातही असाच प्रकार उघडकीस आला. २३ वर्षांच्या एका तरुणाने आपल्या घराच्या छतावर गळफास घेऊन आत्महत्या केली. देव रंजन दास असे या तरुणाचे नाव होते. रविवारी रात्री क्रिकेट सामना संपल्यानंतर काही वेळातच त्याने आत्महत्या केल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले. देव याच्यावर आधीपासून मानसोपचार सुरु होते. त्याला इमोशनल डिसॉर्डर सिंड्रोम हा आजार होता, असे सांगण्यात आले. सामना संपल्यानंतर तो तणावात होता, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.