वैद्यकीय महाविद्यालयात तरुणीची आत्महत्या

0

 

यवतमाळ- यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींच्या वस्तीगृहामध्ये एका एमबीबीएस विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुहानी सहदेव ढोले, वय १९ रा. धाराशिव. असे या मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाला शिकत होती. आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. दरम्यान या प्रकरणी वडील सहदेव ढोले, यांनी यवतमाळ शहार पोलिसात तक्रार दिली. पुढील चौकशी शहर पोलीस स्टेशन यवतमाळ करीत आहेत, अशी माहिती यवतमाळ शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांनी दिली आहे.