मुंबईत पोलीस हवालदाराची आत्महत्या : नेमकं प्रकरणं काय ?

0

मुंबई(Mumbai), 15 जून :-  मुंबईत एका पोलीस हवालदाराने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विजय साळुंखे असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. ३८ वर्षीय विजय साळुंखे(Vijaya salunkhe) यांनी सायनमधील प्रतीक्षा नगर येथील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या(Suicide) केली. पत्नीच्या त्रासाला कंटाळून पोलीस हवालदार विजय साळुंखे यांनी आपले जीवन संपवल्याची माहिती मिळतेय.

३० मे रोजी मुंबईतील शाहुनगर पोलीस ठाण्यात साळुंखे यांची बदली झाली होती. मात्र, आजारपणाच कारण सांगत साळुंखे यांनी सुट्टी घेतली होती. अशातच विजय साळुंखे यांनी काल रात्री घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या खिशात सुसाईड नोट सापडली असून त्यात आत्महत्येच्या कारणाचा खुलासा झाला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. विजय साळुंखे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पुढील तपास वडाला टीटी पोलीस करत आहेत.