

नागपूर (Nagpur) -शहरातील वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.मंगेश मस्के( ब. न.1248 ) असे या आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
उपलब्ध माहितीनुसार,शनिवार (६ एप्रिल) क्वार्टर गार्ड म्हणून डुटीवर असताना एका खोलीत त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच वाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले. मनमिळाऊ स्वभावाच्या मंगेश मस्के यांनी आत्महत्येचे पाऊल का उचलेले यासंदर्भात गूढ कायम असून पोलीस तपासात गुंतले आहेत.