सुहास बहुळकर यांच्‍या ‘दोन पुस्‍तकांचा प्रकाशन सोहळा थाटात

0

बहुळकरांच्या पुस्तकात कला उपासकांच्या जीवनाबाबत सविस्तर भाष्य – मनीषा पाटील

 

(Nagpur)नागपूर: सुप्रसिद्ध चित्रकार ( painter Suhas Bahulkar)सुहास बहुळकरांच्या पुस्तकात कला उपासकांच्या कलाकृतीं आणि जीवनाबाबत सविस्तर भाष्य असून अतिशय सखोल माहिती या पुस्तकातून मिळते, असे मत जे जे स्कुल ऑफ आर्ट च्या निवृत्त अधिष्ठाता व कला अभ्यासक ( Manisha Patil) मनीषा पाटील यांनी व्यक्त केले.
चित्रकार सुहास बहुळकर यांच्‍या ‘कलेतील भारतीयत्‍वाची चळवळ –(The Bombay Revivalist School‘) द बॉम्‍बे रिव्‍हायव्‍हालिस्‍ट स्‍कूल’ आणि ‘नियतीचा विलक्षण खेळ – नगरकर, चिमुलकर, आलमेलकर’ या दोन पुस्‍तकांचा प्रकाशन सोहळा विदर्भ साहित्‍य संघाच्‍यावतीने आज आयोज‍ित करण्‍यात आला त्यावेळी पुस्तकावर भाष्य करताना पाटील बोलत होत्या. तत्पूर्वी प्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार यांच्‍या हस्‍ते या दोन्‍ही पुस्‍तकांचे प्रकाशन झाले. यावेळी मंचावर सुहास बहुळकर, मनीषा पाटील आणि वि सा संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांचीही उपस्थिती होती. सुहास बहुळकर यांनी ‘कलेतील भारतीयत्‍वाची चळवळ’ या विषयावर दृकश्राव्‍य सादरीकरण केले.

राजहंस प्रकाशन तर्फे प्रकाशित ‘कलेतील भारतीयत्‍वाची चळवळ – द बॉम्‍बे रिव्‍हायव्‍हालिस्‍ट स्‍कूल’ या पुस्तकात ब्रिटिशकालीन भारतात पाश्चिमात्य कलाशैलींचा प्रवेश कसा झाला, वेगवेगळ्या कला पद्धती जसे मॉरफ्लॅक्स, वॉश टेक्निक, टेम्प्रा इत्यादी, मुंबईच्या जे. जे. स्कुल मध्ये सर सॉलोमन यांनी आणलेल्या कला, भारतीय अलंकारिक कलेतील चढ उतार आणि त्या दरम्यानचे सर्व कालउपासक याबाबत सविस्तर माहिती आहे. मॅजेस्टिक प्रकाशन तर्फे प्रकाशित ‘नियतीचा विलक्षण खेळ – नगरकर, चिमुलकर, आलमेलकर’ हे पहिल्या पुस्तकाचे सिक्वल असून यात कलाकारांचे जीवन कसे व्यतीत झाले त्यांच्या कलांवर कुठला प्रभाव होता, यावर भाष्य आहे असे पाटील म्हणाल्या. एकूणच कला इतिहास आणि कलाकार याबद्दल उत्तम संशोधन आधारित माहिती दोन्ही पुस्तकात असल्याचे त्या म्हणाल्या.

तत्पूर्वी, सुहास बहुळकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की पुस्तक प्रकाशन नागपुरात होत असल्याचा विशेष आनंद आहे. या पुस्तकात काही हजार चित्र आणि अनेक चित्रकार आणि त्यांच्या शैली याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आपल्या कडील समृद्ध कला वारसा जतन करण्याची आणि त्याचे दस्तावेजीकरण होण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली.
(Pradip Date)प्रदीप दाते यांनी कला आणि साहित्य या बाबत कायमच विदर्भ साहित्य संघ चांगले कार्य प्रोत्साहित करीत असतो असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक (Praful Shiledar) प्रफुल्ल शिलेदार यांनी केले तर सूत्रसंचालन (Vrishali Deshpande)वृषाली देशपांडे यांनी केले. या कार्यक्रमाला वाचनप्रेमी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.
सुरवातीला विदर्भ साहित्‍य संघाच्‍या कलादालनात चित्रकार (Hemant Manmode)हेमंत मानमोडे यांच्‍या चित्रांच्या प्रदर्शनाचे उदघाटन झाले. हे प्रदर्शन 29 जून ते 4 जुलै दरम्‍यान दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत खुले राहणार आहे.
…….
कलेच्या इतिहासाची माहिती नसल्याबद्दल खंत – महेश एलकुंचवार (Mahesh Elkunchwar)
नवीन पिढीला कलेच्या इतिहासाबद्दल माहिती नसल्याची खंत ज्येष्ठ नाटककर महेश एलकुंचवार यांनी बोलून दाखवली. सरकारने व्हिजन ठेऊन कलेविषयक माहिती अभ्यासक्रमात समाविष्ट केली पाहिजे. यासाठी नागरिकांनी देखील मागणी करावी असे मत त्यांनी व्यक्त केले. बारावी पर्यंत संपूर्ण अभ्यासक्रमात सध्या अशी माहिती नसल्याने येणाऱ्या पिढयांना कलेबद्दल महिती नसणे साहजिक आहे असे ते म्हणाले. बहुळकर यांचे काम अत्यंत वाचनीय असल्याचे सांगत कलेबद्दल माहिती करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.