ऊस उत्पादक शेतकऱ्यांची जामनी साखर कारखान्यावर धडक

0

 

(Wardha)वर्धा – मानस अग्रो युनिट जामनी अंतर्गत येणाऱ्या ऊस उत्पादक शेतकरी हा कारखान्याच्या धोरणाला आणि ढिसाळ नियोजनांना कंटाळल्याने आज अखेर ऊस उत्पादक शेतकरी यांनी जामनी येथील साखर कारखान्यावर धडक दिली. कारखान्यांकडून होत असलेली ऊसतोड ही ताबडतोब वाहतुकीस नेऊन वजनाचे मेसेज आणि पावती 24 तासांत शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी, मागणी शेतकरी यांनी यापूर्वी सुद्धा केलेली होती.

परंतु अजूनही त्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने आज पुन्हा शेतकऱ्यांनी कारखान्यावर धडक दिली. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.