सुधीर मुनगंटीवार यांच्या ‘त्या’ वक्तव्याने महाआघाडीत खळबळ

0

मुंबई (Mumbai) (शंखनाद ब्यूरो रिपोर्ट) :- महाविकास आघाडी सोबत सध्या असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार हे आमचे कट्टर विरोधक झालेत पण त्यांना कायमस्वरूपी विरोधक म्हणण्याची गरज नाही असे वक्तव्य राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सोमवारी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीच्या गोठामध्ये खळबळ माजली आहे.

राज्यात युतीचे सरकार आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडले आणि अजित पवार यांचा गट सत्तेत सहभागी झाला. तेव्हापासून शरद पवार यांच्या गटातील अनेक नेते अजित पवार यांच्या गटामध्ये येऊ लागली आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट महायुतीच्या सोबतीने निवडणूक लढला. भविष्यातही तो महायुतीत राहण्याची शक्यता आहे. अशातच शरद पवार हे कायमस्वरूपी विरोधक राहणार नाहीत, असे सूचक विधान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केल्यामुळे भविष्यात ते महायुतीत सहभागी होतील अशी चर्चा आता सुरू झाली आहे.